शासकीय नोकरी मिळवण्यासाठी एका पित्याने आपल्या तिसऱ्या मुलीला दुसऱ्याला देऊन टाकल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. नोकरीस अडथळा ठरेल या भीतीने एका बापाने स्वतःच्या मुलीचा सौदा केल्याचा आरोप पत्नीने केला असून, पोलिसांनी या प्रकरणी
.
नांदेड येथील रहिवासी सुरेखा यांचा विवाह 2009 साली गजानन वांजरखेडे यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. 2011 मध्ये गजानन यांचे वडील निधन पावले. त्यानंतर गजानन यांना अनुकंपा तत्वावर 2018 मध्ये हिंगोली येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात शिपाई पदाची नोकरी लागणार होती. मात्र, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी फॉर्ममध्ये ‘तिसरं अपत्य नाही’ असा उल्लेख आवश्यक असल्यामुळे गजानन याने आपल्या तिसऱ्या मुलीला दुसऱ्या कुटुंबाकडे सोपवण्याचा विचार होता. पत्नीने याला विरोध केला. त्यामुळे गजाजनने तिलाही घराबाहेर हाकलून दिले. सुरेखा यांनी पुढील काही वर्षे मजुरी करून आपला उदरनिर्वाह केला.
आठ वर्षांनी प्रकरण उजेडात
सुरेखा यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या तिसऱ्या मुलीबाबत माहिती मिळाली की, ती एका नातेवाईकाच्या घरी राहत असून तिच्या कागदपत्रांवर वडिलांचे नाव गजानन नव्हे, तर दुसऱ्याच व्यक्तीचे आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी सुरेखा यांनी एका वकिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना निराधार महिलांना मदत करणाऱ्या एनजीओबद्दल माहिती मिळाली. या एनजीओने मुलगी राहत असलेल्या गावात जाऊन तपास केला. शाळेतील कागदपत्रे आणि जन्म प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर मुलीच्या वडिलांच्या नावात गोंधळ आढळून आला. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर सुरेखा यांनी नांदेडच्या भाग्यनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.
एक लाख रुपयांचा ‘सौदा’?
माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप महिलेने केला आहे. माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि पतीविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.
हे ही वाचा…
संतापजनक:नांदेडमध्ये एक लाख रुपयांसाठी लग्नाच्या बाराव्या दिवशीच नवविवाहितेला विष पाजून मारले, पती, सासरा, सासू, दिराविराेधात गुन्हा दाखल
हुंड्यातील १ लाख रुपये न आणल्याने सासरच्या लोकांनी नवविवाहितेला लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांनी विष पाजून मारले. राठोडवाडी (अखरगा) (ता.मुखेड) येथे 13 जुलैला ही घटना घडली. ताऊबाई सुधाकर राठोड (18) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह सासरा, सासू व दिरावर गुन्हा दाखल झाला. पती सुधाकरला अटक केली आहे. वसूर तांडा येथील वामन चव्हाण यांची मुलगी ताऊबाई हिचे लग्न राठोडवाडी (अखरगा) येथील सुधाकर राठोडसोबत 2 जुलैला झाले. सविस्तर वाचा…