भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची ‘सामना’ला दिलेली मुलाखत ही पूर्णपणे नियोजित आणि पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. ही मुलाखत म्हणजे घरघुती संवाद, जिथे प्रश्न आधीच ठरलेले असतात आणि केवळ स्वतःचे कौतुक करून घेण्याच
.
सुधीर मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की, सध्या ठाकरे ब्रँड ना जनतेला ना ग्राहकांना भावतो, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या मुलाखतीत केवळ इतरांवर टीका आणि शिवीगाळ आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीसंदर्भात कोणताही ठोस विचार नाही.
घरगुती मुलाखत
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंची संजय राऊत यांनी घेतलेली घरगुती मुलाखत आहे. स्वत:चे कौतुक आणि लोकांना शिव्या अशी मुलाखत लोकांना आवडत नाही. या मुलाखतीबद्दल लोकांना आकर्षण नाही. जर काही नवीन ज्ञान मिळणार असेल तर ती मुलाखत लोकांना आवडत असते. महाराष्ट्राच्या प्रगतीचे काही बीजारोपण होत आहे, काही वैचारिक आपल्याला नावीन्यपूर्ण गोष्टी समजत आहे.
दाव्यावर विश्वास ठेवू नका
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राजकारणामधील दिशा मिळत आहे, राजकारणात निष्ठावान कसे असावे. काँग्रेस सारख्या पक्षांनी जे देशाचे नुकसान केले त्याबद्दल काँग्रेसपासून दूर कसे असावे अशा काही गोष्टी असल्या तर मुलाखत पाहावी वाटते. शिव्या देणे म्हणजे काय मुलाखत आहे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची यापूर्वी एक मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांना पंतप्रधान पदापर्यंत पोहचवले होते. त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवू नये, असे मला वाटते.
..तर आम्ही मुलाखत ऐकली असती
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे वारंवार पराभूत होत असल्याने निवडणूक आयोगावर खापर फोडत आहेत. जर उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या विकासाचे विचार, एखादे नवे दृष्टिकोन असते, तर आम्ही आदरपूर्वक ऐकली असती. मात्र केवळ शिव्या देणे आणि स्वतःचे कौतुक करण्यापुरतीच ही मुलाखत सीमित राहिली.
..तर चित्र वेगळं असते
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे विनंती केली असती, तर आज चित्र वेगळे असते. बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकतात, तर ठाकरेही होऊ शकले असते. मात्र आज ठाकरे गट गुजरात, केंद्र सरकार आणि मोदी-शहा यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत असल्याचेही त्यांनी नमूद केले.