‘ज्याच्या पोरीने मंगळसूत्र घालणारा न निवडता…’, नताशा आव्हाडबद्दल नको त्या शब्दात भाष्य; थेट फडणवीसांना…


Natasha Awhad Inter Religion Marriage: भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या मुख्य इमारतीच्या लॉबीमध्ये तुफानमध्ये राडा झाला. गुरुवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारस झालेल्या या गदारोळाचे राजकीय पडसाद कालपासून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असं असतानाच आता या वादामध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनाही गोवण्याचा प्रयत्न काहींनी केली आहे. टीका करणाऱ्यांला नताशा यांनी कठोर शब्दांमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत नाराजी व्यक्त केली आहे. 

रात्रभर राडा

आव्हाड आणि पडळकर यांच्यात दोन दिवसापूर्वी शाब्दिक बाचाबाची झाली. याचेच पर्यावसन पुढे हाणामारीमध्ये झालं. पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या नितीन देशमुख या कार्यकर्त्याला लॉबीमध्ये मारहाण केली. यावरुन अगदी मध्यरात्रीनंतरही विधानसभेच्या आवारात अटक नाट्य रंगलं. आव्हाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर बसून ठिय्या आंदोलन केलं. ज्याने मार खाल्ला त्यालाच अटक केली जात असल्यावर आक्षेप नोंदवत आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवली. मात्र पोलिसांनी आंदोलक आणि आव्हाडांना चकवा देत नितीन देशमुखला आझाद नगर पोलीस स्टेशनला नेलं. तिथेही जाऊन आव्हाड यांनी आंदोलन सुरु केलं. 

पडळकरांची पहिली प्रतिक्रिया

दुसरीकडे पडळकर यांनी शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांसमोर सहकाऱ्यांकडून चूक झाल्याचं मान्य करताना, विधानसभा अध्यक्षांना तुमच्या पद्धतीने कारवाई करा असं कळवल्याचं सांगितलं. तसेच आपल्या दोन कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवण्यात आल्याचं पडळकर म्हणाले. अटक करण्यात आलेल्या पडळकरांच्या समर्थकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी ऋषीकेश टकलेचाही समावेश आहे. आव्हाड यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मारहाण करणारे पाच जण होते तर त्यापैकी तिघे कुठे पळाले असा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.

नताशा यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट

एकीकडे या घडामोडी सुरु असतानाच सोशल मीडियावर दोन्हीकडील समर्थक एकमेकांना भिडल्याचं दिसत आहे. अशाच एका पोस्टमध्ये आव्हाडविरोधकाने पातळी सोडून त्यांच्यावर टीका केली आहे. “ज्याच्या पोरीने मंगळसूत्र घालणारा न निवडता इतरधर्मीय निवडला तो आता मंगळसूत्राच्या नावाने गावभर बोंबलत आहे!” असं कमेंट महेश चोरमाले नावाच्या व्यक्तीने केली आहे. “कॉकटेल फॅमिलीचा पाळीव कुत्रा” असंही या पोस्टमध्ये टीका करताना म्हटलं आहे. या पोस्टमध्ये अश्लील शब्दही वापरण्यात आलेत.

नताशा यांनी दिलं जशास तसं उत्तर

नताशा यांनी हे ट्विट कोट करुन रिट्वीट करताना जशास तसं उत्तर देत थेट मुख्यमंत्री फडणवीसांना टॅग केलं आहे. “जसा राजा तशी प्रजा! सगळे गुंडे”, असं म्हणत नताशा आव्हाड यांनी त्यांच्या वडीलांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्याला रिप्लाय दिला आहे. “या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही. तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे,” असं नताशा यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांचं अधिकृत एक्स अकाऊंट टॅग केलं आहे. “देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस तुम्ही मजा पाहात राहा फक्त,” असं नताशा यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलंय.

नताशा यांचं लग्न कोणाशी झालं?

2021 साली डिसेंबर महिन्यात नताशा आव्हाड यांचं लग्न एलन पटेलसोबत झालं असून दोघे आज विवाहबंधनात अडकले. आधी रजिस्टर पद्धतीने लग्न आणि नंतर या जोडप्याने समुद्रकिनाऱ्यावर ख्रिस्ती पद्धतीने लग्न केलं होतं. मुलीच्या लग्नाच्या वेळी आव्हाड भावूक झाले होते. त्यांनी डोळ्याला रुमाल लावत आश्रू पुसले आणि प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया नोंदवलेली. “25 वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे,” असं सांगताना जितेंद्र आव्हाड यांनी अश्रू आनावर झालेले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24