एसटीत काय सुरू हे मलाच माहिती नाही: राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता; वाचा काय आहे सरनाईकांच्या संतापाचे कारण? – Mumbai News



एकीकडे आषाढी वारीच्या काळात एसटीला चांगले उत्पन्न मिळाल्याचा दावा केला जात आहे. पण दुसरीकडे, एसटी महामंडळातील त्रुटी, बसेसची दुरवस्था आदी अनेक मुद्यांवर हे महामंडळ वादात सापडले आहे. त्यातच स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात काय सु

.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत पुण्यातील दापोडी व छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा मध्यवर्ती भांडार खरेदीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी त्यांनी इतरही काही प्रश्न सत्तापक्षाला विचारले. त्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले. अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आरोप निश्चित झाले तरीही ते त्याच जागी कायम राहतात, असे नमूद करत त्यांनी एका अधिकाऱ्यावर नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांची जंत्रीच वाचून दाखवली. त्यावर सभापती राम शिंदे यांनी टोकत त्यांना सरकार काय कारवाई करणार हे सांगा? अशी सूचा केली. त्यानंनतर आमदारांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली. त्यावर सभापती राम शिंदे यांनी, कारवाई काय करणार हे सांगा, अशी सूचना केली. आमदारांनीही कारवाईची मागणी केली.

महामंडळातील अनागोंदीच्या आरोपांची जंत्री

त्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले, अनिल परब यांनी सभागृहात दिलेल्या माहितीत तथ्य आहे. मागील अनेक वर्षांपासून महामंडळात अनागोंदी सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून कामात निष्काळजीपणा, नुकसानीस प्रतिबंध न करणे, नियमावलीचा भंग करणे, नियमबाह्य खरेदी प्रक्रिया राबवणे, जास्त दराने खरेदी करणे, अतिरिक्त खरेदी करून रक्कम अडवून ठेवणे, न झालेली खरेदी दाखवणे, नोंदी ठेवण्याकडे दुर्लक्ष करणे, अधिकारांचा गैरवापर करणे, पुरेशी खातरजमा न करता जास्तीची रक्कम अदा करणे, वरिष्ठ लेखा अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार होत आहेत.

त्यानंतर या अधिकाऱ्यांची केवळ चौकशी झाली आहे. दोषी आढळूनही ते महामंडळात कायम आहेत, असे सरनाईक म्हणाले. त्यानंतर ते अनिल परब यांना उद्देशून म्हणाले, तुम्हीही या खात्याचे मंत्री होतात. तुम्हालाही पटेल की, एसटी महामंडळात नेमके काय सुरू आहे तेच कळत नाही. अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आरोप निश्चित झाले तरी ते त्याच जागी कायम राहतात. एसटी महामंडळात गेल्या काही वर्षांपासून काय चालले आहे हे मलाही कळत नाही.

बडतर्फीचे सूतोवाच अन् मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

त्यानंतर त्यांनी गंभीर गैरव्यवहारांत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर बडतर्फ करण्याचे सूतोवाच केले. पण मध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. एखाद्याला अधिकाऱ्याला असे तत्काळ बडतर्फ करू नका. ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) जातात आणि पुन्हा कामावर येतात. त्यासाठी त्यांना बडतर्फ करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवा. त्यांना नोटीस द्या. त्यांचे म्हणणे ऐकूण घ्या. नंतर बडतर्फ करा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा…

मंत्रालय, नाशिक, ठाणे हनीट्रॅपचे केंद्र:नाना पटोले यांचा गंभीर आरोप, सभागृहात पेनड्राईव्ह दाखवला; सरकारवर स्पष्टीकरण न देण्याचा आरोप

मुंबई – राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरूवारी सलग दुसऱ्यांदा हा विषय हा विषय विधानसभेच्या पटलावर मांडला. तसेच या प्रकरणी सभागृहाच्या अध्यक्षांनी निर्देश दिल्यानंतरही सरकार स्पष्टीकरण देत नसल्याचा आरोप केला. दरम्यान, राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पटोले म्हणतात तसे काही घडलेच नसल्याचा दावा करत आपल्या तोंडावर बोट ठेवले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24