सतत बदलत असलेल्या काहीशा विचित्र वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनने सध्या जिल्ह्यात कहर केला असून, डास, किटकांपासून तसेच पाण्यापासून होणाऱ्या साथरोगांनी चांगलेच हातपाय पसरले आहेत. खासगी क्लिनिक, हॉस्पीटल्समध्ये विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली अ
.

जिल्हा सामान्य रुग्णालयात एका खाटेवर दोन रुग्ण ठेवण्याची वेळ आली होती. परंतु, रुग्णालय प्रशासनाने काहींना खाली गादी टाकून तर काहींची अस्थिरोगासारख्या वॉर्डात जेथे रुग्णांची संख्या कमी आहे, तेथे सोय केल्यामुळे रुग्णांची तात्पुरती सोय झाली आहे.
मागील पंधरा दिवसापासून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णसंकेत वाढ झाली आहे. ओपीडी मध्ये दर दिवशी ६० ते ७० रुग्ण सर्दी, खोकला, तापाचे येत आहेत. तसेच जिल्ह्यातील उप जिल्हा रुग्णालयात दिवसाला १२० ते १५० रुग्ण रोज उपचार घेत आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील दिवसाला ४० रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच शहर व गावागावतील खासगी दवाखान्यात ही मोठ्या प्रमाणात रूग्ण उपचार घेत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत उर्वरित. पान ४ ^पावसाळ्यात जलजन्य, किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते. बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) या रुग्णांची संख्या वाढली. पूर्वी १० ते १५ रुग्ण व्हायरल फिव्हरचे असायचे, आता दरदिवशी ६० ते ७० रुग्ण येत आहेत. यातील काही रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल करावे लागते. सद्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहे. डॉ दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक.
जिल्ह्यात सहा महिन्यात डेंग्यू आजाराचे ५२ रुग्ण जानेवारी ते जून या सहा महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यू संशयितांचे ६६१ नमुने घेण्यात आले. त्यापैकी तपासणीअंती ५२ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. यात ग्रामीण क्षेत्रात ४७९ नमुने घेतले. . त्यात ३५ डेंग्यू रुग्ण आढळून आले. मनपा क्षेत्रात १९२ नमुन्यांमध्ये १७ डेंग्यूचे रुग्ण आहेत. ग्रामीण भागात ३३ तर शहरात १० चिकनगुनिया चे रुग्ण आढळले. शहरात जुलैच्या सुरुवातीला संशयित ९ नागरिकांचे नमूने घेण्यात आले. त्यामध्ये ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. ज्यात डेंग्यूच्या ४ तर ४ चिकनगुनियाच्या रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या वाढली