सध्याचे सरकार हे सामान्य लोकांचे नाही तर मोठ्या कारखानदारी उद्योगपतीचे सरकार आहे. त्यामुळे या पुंजीपतीची साथ या सरकारला आहे. गरिबांसाठी सरकारचे सहकार्य नाही. गरिबांचे सरकार असते तर पेट्रोलचे दर शंभर रुपये पार गेले नसते. डाळी दीडशे रुपये पार गेल्या नस
.
अनिस पटेल यांची कॉंग्रेसच्या जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा व शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ता यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष वझाहत मिर्झा, शहराध्यक्ष युसुफ शेख, माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष मोईन ईनामदार इकबालसिंह गिल यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी गांधी भवनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गदी पहायला मिळाली. त्यामुळे प्रदेश अध्यक्षांनी देखील अनिस पटेल यांचे कौतुक केले.
विकासाच्या गोष्टीवर नाही हिंदु मुस्लीमवर चर्चा
यावेळी अहमद खान म्हणाले की, भाजपचे सरकार विकासाच्या मुद्यावर चर्चा करत नाही. केवळ हिंदु मुस्लीम एकमेकात फुट पाडून ते चर्चा करतात. वक्फ बिलावर चर्चा करतात. एकमेकाना लढवण्याच्या बाबत त्यांचा प्रयत्न असतो. मात्र भारतात हिंदु मुस्लीम एकी आहे. त्यामुळे काहीही झाले तरी एकी फुटणार नाही. भारतात हिंदु मुस्लीम शिख इसाई पारशी हे सर्व एकत्र आहेत. या एकीकरणामुळेच विकास होत आहे. ज्यावेळी फुट टाकण्याचे प्रयत्न होतील त्यावेळी विकासात अडचणी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले.
एक किमी तरी पायी चालत जा
यावेळी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष वजाहत मिर्झा म्हणाले की, राहुल गांधी यांनी साडेपाच हजार किमी प्रवास केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी किमान एक किमी पायी रोज चालत जावे. यामध्ये काँग्रेसने केलेली कामे सांगावीत. तसेच पाण्याचा प्रश्न लोकांसमोर मांडावा अश्या सूचना केल्या.