राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या मानधनासाठीची पात्रता ठरविण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कलावंत आणि साहित्यिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक कलावंतांनी त्यांच्यातील अंगभूत कलांचे सादरीकरण केले, असे जि.प. प्रश
.
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात कलावंतांच्या मुलाखतीचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. सोमवार, १४ जुलैपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या प्रक्रियेच्या माध्यमातून अंतिमत: १०० कलावंत व साहित्यिकांची निवड केली जाणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने शासनाने त्यासाठी योजना तयार केली असून निवड झालेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना दरमहा ५ हजार रुपये मानधन दिले जाईल. तीन दिवस चाललेल्या मुलाखतीदरम्यान सदर कलावंतांकडून प्रत्यक्ष सादरीकरणही करवून घेण्यात आले. त्याचवेळी ऑनलाइन प्रस्ताव दाखल करताना त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार जिल्हाभरातून ५७९ कलावंतांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी प्रत्यक्ष मुलाखत व सादरीकरणाला चारशेहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या सूचनेनुसार समितीचे मानद सचिव तथा जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे डेप्युटी सीइओ बाळासाहेब बायस, महापालिकेचे उपायुक्त, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी व पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार निवडण्यात आलेले अन्य अशासकीय प्रतिनिधी यांनी मुलाखतीचे कामकाज पूर्ण केले. पहिल्या दिवशी स्वत: सीइओ संजीता महापात्र यांनीही काही जणांच्या मुलाखती घेतल्या. त्या सुद्धा निवड समितीच्या एक सदस्य आहेत