सचिवाचा पदभार काढून घेण्याचे निर्देश आणि संचालक मंडळाच्या बरखास्तीबाबत हायकोर्टाच्या निर्णयाची प्रतिक्षा अशी प्रशासकीय बाजू पुढे आल्यानंतर आज, बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिश मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शासनाकडून अद्याप कोणताही
.
राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सचिवाचा पदभार त्वरेने काढून घेण्यात येईल आणि संचालक मंडळाच्या भवितव्याबाबत हायकोर्टाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जाईल, असे म्हटले होते. तो मुद्दा स्पष्ट करताना मोरे म्हणाले, स्वत:ला तथाकथित शेतकरी नेते म्हणवणाऱ्या काही जणांनी आमदार खोडके यांना खोटी माहिती पुरवली. तक्रारदार स्वत: गेल्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. परंतु अजूनही त्यांच्या डोक्यातून पराभवाचे शल्य निघाले नाही. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ते बाजार समितीविरोधी तक्रारी करीत असतात. तक्रारीच्या या क्रमात त्यांनी चहा-नाश्त्यासारख्या अत्यंत लहान बाबींचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी तक्रारी करीत रहायचे आणि आम्ही आपली कामे नियमित सुरु ठेवायची, अशी सध्याची स्थिती आहे.
मुळात ज्या चौकशी अहवालाचा हवाला मंगळवारी विधीमंडळात देण्यात आला, त्या चौकशी अहवालात कोठेही भ्रष्टाचार हा शब्द नाही. त्यात केवळ अनियमितता या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय ज्या कामामध्ये अनियमितता झाली, असे चौकशी अहवालाचे म्हणणे आहे, त्या बाजार समिती परिसरातील ओट्यांच्या कांक्रीटीकरणात विद्यमान संचालक मंडळाने तब्बल २० लाख रुपयांची बचत केली आहे. एवढेच नव्हे तर कधी नव्हे एवढ्या ७ कोटी रुपयांच्या मुदती ठेवी आमच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात ठेवण्यात आल्या आहेत. ही प्रगती त्या तक्रारदारांकडून पाहवली जात नाही. त्यामुळे ते चुकीची माहिती पुढे करुन संचालक मंडळ व सचिवांवर आरोप लावतात. नेमक्या याच मुद्द्याला आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात आव्हान दिले असून या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरु आहे. त्यांच्यामते दोन वर्षांपूर्वी समितीचा कारभार १७ कोटी रुपये होता. तो सध्या २१ कोटी रुपयांवर पोचला आहे. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असून त्यांच्याकडून भविष्यात जे निर्देश दिले जातील, त्याचे पालन केले जाईल. सत्ताधाऱ्यांमधील काही राजकारणाऱ्यांना बाजार समित्या बळकावयाच्या आहेत. त्यासाठी हे राजकारण केले जात असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. यावेळी बाजार समितीचे सचिव दीपक विजयकरदेखील उपस्थित होते.