देशात प्रथमच टेस्ला कार 15 जुलै रोजी दिमाखात दाखल झाली. त्यानंतर 16 जुलै रोजी ही देशातील पहिली टेस्ला कार थेट महाराष्ट्राच्या विधानभवनात दाखल झाली. काल पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित
.
विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेस्ला गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली. यावेळी परिसरात ही कार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. टेस्ट ड्राइव्ह घेतली आणि त्यांचा अनुभव सांगितला. एकनाथ शिंदे म्हणाले, टेस्ला कार खूप चांगल्या आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय खूप चांगला होईल.
टेस्ला कार खरेदी करण्याची इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी ही पहिली कार घेणार आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच, टेस्लाची कार बुकिंगसाठी केव्हा उपलब्ध होईल? असा प्रश्न विचारण्यात आला असता, सरनाईक म्हणाले की, आत्तापर्यंत केवळ शोरूमचे उद्घाटन झाले असून लवकरच बुकिंग व वितरण प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात येईल.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. मुंबईतील हे टेस्ला सेंटर केवळ एक्सपीरियन्स सेंटर न राहता, डिलिव्हरी लोकेशन, लॉजिस्टिक सेंटर आणि सर्व्हिसिंग युनिट म्हणूनही कार्यरत होणार आहे. याठिकाणी टेस्ला कार्सचे बुकिंग अधिकृतपणे सुरू झाले आहे.
टेस्लाचे जागतिक स्तरावर लोकप्रिय मॉडेल ‘Model Y’ आज भारतात लाँच करण्यात आले आहे. ही कार केवळ 15 मिनिटांत चार्ज करता येते आणि एकदा चार्ज केल्यानंतर 600 किलोमीटरपर्यंत धावू शकते. शून्य प्रदूषण करणारी ही इलेक्ट्रिक कार सुरक्षिततेच्या दृष्टीने जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानली जाते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात नमूद केले.