पर्जन्यमान: राज्यात यंदा मराठवाड्यात 73.5% सर्वात कमी पाऊस, पावसाच्या दिवसांतही पाच दिवसांची घट – Chhatrapati Sambhajinagar News



महाराष्ट्रात १ जून ते १० जुलैपर्यंत ३१४.३ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३२९ मिमी म्हणजे १०४.७ टक्के पर्जन्यमान झाले आहे. नागपूर विभागात सर्वाधिक १३८.७ आणि अमरावती विभागात ११७.७ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी ७३.५ टक्केच पाऊस पडल्याची

.

हवामान विभाग, संस्था आणि शास्त्रज्ञांनी यंदा सरासरीइतका व त्यापेक्षा १० टक्क्यांपर्यंत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनच्या ४० दिवसांत त्यानुसार राज्यात ४.७ टक्के जास्त पाऊस पडला आहे. मात्र, हवामान बदलामुळे कुठे धो-धो तर कुठे हलका पाऊस पडत आहे. म्हणजेच असमान पावसाचे वितरण होत आहे. त्यानुसार विदर्भात या वर्षी पावसाचे वितरण जास्त झाले आहे. मराठवाड्यात सर्वात कमी आणि नाशिक, कोकण, पुण्यात सरासरीच्या तुलनेत किंचित कमी पाऊस पडला आहे.

बीड सर्वात कमी पाऊस

बीडला ५० टक्क्यांपेक्षा सर्वात कमी पाऊस, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर, परभणीसह ८ जिल्ह्यांत ७५ टक्क्यांपर्यंत, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर एकूण १२ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्केदरम्यान आणि ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची नोंद राज्य कृषी विभागाने घेतली आहे.

चौथ्या आठवड्यात पाऊस

जिथे पोषक वातावरण होते तिथेच पाऊस पडतोय. उर्वरित ठिकाणी हलका ते मध्यम व काही ठिकाणी कोरडेठाक राहिले आहे. आता एक आठवडा उघडीप मिळेल. काही तुरळक ठिकाण अपवाद असेल. जुलैच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिथे पेरणी झाली तिथे अांतरमशागतीची कामे उरकून घ्यावीत. खूपच पाऊस कमी आहे तेथील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. -डॉ. रामचंद्र साबळे, हवामान शास्त्रज्ञ

विभागनिहाय पर्जन्यमानाचा आलेख

विभाग अपेक्षित पाऊस प्रत्यक्षात पाऊस टक्केवारी कोकण १००५.७ मिमी ९६८.९ मिमी ९६.४ टक्के नाशिक २१०.२ मिमी २०८.९ मिमी ९९.४ टक्के पुणे ३०४.१ मिमी २९४.४ मिमी ९६.८ टक्के संभाजीनगर १९४.१ मिमी १४२.६ मिमी ७३.५ टक्के​​​​​​

गतवर्षी १४७.३ टक्के विक्रमी पाऊस

अमरावती २२४.९ मिमी २६४.८ मिमी ११७.७ टक्के नागपूर ३०४ मिमी ४२१.७ मिमी १३८.७ टक्के



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24