सासवडमध्ये अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई: गोवा बनावटीच्या व्हिस्कीसह 1.33 कोटींचा मुद्देमाल जप्त, चालकाला अटक – Pune News



राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या भरारी पथकाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत सासवड गावच्या हद्दीत वीर फाटा जेजुरी-सासवड रोड, पुरंदर येथे १ कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे,अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे

.

याबाबत सासवड विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहन टाटा कंपनीचा एलपीटी (१२१२) सहा चाकी माल वाहतूक कंटेनर क्र. MH-४९-एटी-३४७१ वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्य बनावटीचे रॉयल ब्लु माल्ट व्हिस्की मद्याचे १८० मि.ली क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या या प्रमाणे एकूण १२०४ बॉक्स (५७ हजार ७९२ बाटल्या) अशा प्रकारे एकुण रुपये १ कोटी १५ लाख ५८ हजार ४०० हजार इतक्या किमतीचा मद्यसाठा, वाहन व मोबाइलसह एकूण १ कोटी ३३ हजार ७८ हजार ४०० रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ तील कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक संभाजी बरगे यांनी सहभाग घेतलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे हे करीत आहेत.

जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध नियमित कारवाई सुरु राहणार असून कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री. क्रमांक. १८००२३३९९९९ व दुरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24