अलिबागमध्ये सेकंड होमच्या शोधात असणाऱ्यांसाठी ‘हे’ ठिकाण ठरणार बेस्ट; नवा प्लान पाहिला का?


Alibaug Karjat Real Estate : आठवडी सुट्टी, किंवा मग एखादी मोठी सुट्टी… अनेकांचीच धाव असते ती म्हणजे मुंबईपासून काहीशा अंतरावर असणाऱ्या अलिबाग आणि कर्जतसारख्या ठिकाणांकडे. शहरी धकाधकीपासून दूर अशा या ठिकाणांकडे फक्त पर्यटकांचाच नव्हे, तर भूखंड खरेदी करून तिथं आपलं घर वसवण्याची स्वप्नसुद्धा अनेकजण पाहताना दिसत आहे. अगदी सेलिब्रिटी आणि नेतेमंडळींना भुरळ पाडणाऱ्या या अलिबागकडे आता नामांकित विकासकसुद्धा आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत.

मुख्य म्हणजे समुद्रकिनाऱा, निसर्गाचं वेड लावणारं रुप या साऱ्याच्या सानिध्ध्यात असणाऱ्या ठिकाणांवर होणाऱ्या या विकासामुळं सेकंड होमच्या शोधात असणाऱ्या अनेक मंडळींना एक कमाल संधीच उपलब्ध होत असून निमित्त ठरत आहेत त्या काही कमाल योजना.

नामांकित विकासकाची एक कमाल योजना

अशाच नामांकित विकासकांपैकी एक नाव म्हणजे पेनिन्सुला लँड. अशोक पिरामल ग्रुपच्या या विकासक कंपनीकडून अलिबाग आणि कर्जमध्ये तब्बल 40 एकरांच्या भूखंडाची खरेदी करण्यात आली आहे. मुंबईपासून काहीच अंतरावर असणाऱ्या या ठिकाणांकडे असणारी विकासाची संधी पाहता हा व्यवहार करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कंपनीकडू देण्यात आलेल्या माहितीनुसार 11 एकर भूखंड अलिबागच्या सोगाव इथं मिळाला असून 29 एकर जागा कर्जतच्या भिलवले इथं घेण्यात आली आहे. गेल्या काही काळात लोढा समुह, ओबेरॉय रिअल्टी, हिरानंदानी, महिंद्रा लाईफस्पेस, झेन ग्रुप, एमार, ब्रेगो लँड आणि अर्थ यांसारख्या विकासकांच्या रांगेत पेनिन्सुलाचाही सहभाग असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान अलिबागसह कर्जतसारख्या ठिकाणांवर करण्यात आलेल्या या भूखंड खरेदीतून कंपनीकडून ‘प्लॉटेड कम्युनिटी’च्या धर्तीवर बांधकाम केलं जाणार असून वास्तव्यासाठी सुरक्षित आणि सर्व सुविधा-सेवांसह समावेशक अनुभव देण्यावर विकासकांचा भर असेल. अनेक शहरी कुटुंब, गुंतवणुकदार, सेंकड होमच्या शोधात असणाऱ्या मंडळींसाठी ही एक सुवर्णसंधीच असेल असा दावा कंपनी करत आहे. दरम्यान या भूखंडावरी घरांचे दर नेमके किती असतील, त्यांचं क्षेत्रफळ काय असेल याबाबतची अधिकृत माहिती मात्र अद्यापही समोर आली नसून आता बांधकामानंतरच ही किमया नेमकी कशी दिसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24