विट्स हॉटेल खरेदी प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिरसाट यांच्या पत्नी व मुलासह इतर तीन भागीदार कोण होते, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. इतकेच नव्ह
.
संजय राऊत यांना पाठवलेल्या नोटीशीवर नाराजी
संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना पाठवलेल्या अब्रूनुकसानीच्या नोटिशीवरही अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या दोन संजय आमच्या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत त्यांनी या संदर्भात महाभारताचा दाखला दिला. एकजण धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे, तर संजय राऊत अर्जुनासारखे सत्ताधारी आघाडीतील भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत, असे म्हणत त्यांनी राऊतांच्या भूमिकेचे समर्थन केले.
आयटीआर न मागता 65 कोटींचा व्यवहार कसा?
अजित पवारांवरही दानवे यांनी टीकास्त्र सोडले. अजित पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे दिले तरी अजून कोणतीही कारवाई झालेली नाही, असे नमूद करत त्यांनी व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विट्स हॉटेल खरेदी प्रकरणात त्यांनी गंभीर शंका उपस्थित करत म्हटले, ज्या कंपनीचे रजिस्ट्रेशनच नाही, अशा कंपनीला टेंडर कसे मिळाले? तीन वर्षांचा आयटीआर भरलेला नाही, तरीदेखील 65 कोटींचा व्यवहार कसा झाला? सामान्य महापालिकेच्या कामासाठीसुद्धा आयटीआर विचारला जातो, मग इथे काय विशेष होते? दानवे यांच्या या टीकेमुळे विट्स हॉटेल खरेदी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिरसाट यांची भूमिका यापुढे कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरसाट यांची दानवेंवर अप्रत्यक्ष टीका
संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत रोज सकाळी लोकांच्या शिव्या खातात.म्हणून त्यांना मान अपमान काही कळत नाही.कोणत्या गोष्टीवर बोलावे याचे त्यांना भान नाही. त्यांचे जे विद्वान सहकारी आहे एक महिन्याचे विद्वान असेच आरोप करत राहणार. हे सगळे दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे.याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे, पण खालच्या राजकारणाकडे मला जायचे नाही. परंतु आता मला असा वाटायला लागले आहे की आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी अंबादास दानवेंवर टीका केला आहे. हे सर्व रुदाली पक्षाचे रडके लोक आहेत. अभ्यास न करता बोलणाऱ्याच्या बुद्धीचा कीव येते.