विद्यादीप बालगृहातील मुलींनी केलेल्या आरोपांनंतर बुधवारी (९ जुलै) छावणी पोलिसांनी सिस्टर सुचिता गायकवाड, केअर टेकर अलका साळुंके आणि सहायक अधीक्षक वेलरी जोसेफ यांना अटक केली आहे. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गोवारीकर यांच्या न्यायालयात दुपारी २.
.
पोलिसांकडून २ आरोपींसाठी ४ दिवसांची पोलिस कोठडी, तर एक आरोपी दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने तिची न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. पोलिसांकडून सरकारी वकिलांनी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याच्या कलमाचा उल्लेख करून मुलींना खाण्यास दिलेली गोळी जप्त करण्यासाठी आणि उर्वरित तपासासाठी ४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यावर पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळोवेळी विहित वेळ देण्यात आला होता.
सर्वांना कोर्टाबाहेर पाठवले
विद्यादीपचे प्रकरण अल्पवयीन मुलींशी निगडित आहे. त्यामुळे न्यायदान करताना सर्वसामान्य व्यक्तींना कोर्टाच्या बाहेर ठेवून न्यायदान करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयात सहायक पोलिस आयुक्त (छावणी) सानप, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, प्रवीणा यादव, रेखा लोंढे, सहायक निरीक्षक विवेक जाधव यांच्यासह छावणी, सिटी चौक, वेदांतनगर ठाण्यातील प्रत्येकी २ ते ३ उपनिरीक्षक आणि १० ते १२ कर्मचारी, असे जवळपास ५० हून अधिक पुरुष व महिला पोलिस न्यायालयात हजर होते.
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपींच्या वतीने ॲड. नीलेश घाणेकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. बालगृहात लावलेले सीसीटीव्ही केवळ निरीक्षणासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींना सीसीटीव्ही लावले असल्याची माहिती होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या निवाड्याप्रमाणे ७ वर्षांच्या आतील शिक्षेत संबंधिताला नोटीस देणे गरजेचे आहे. यात आरोपींवर दाखल सर्व कलमे अशा स्वरूपाची आहेत की, त्यात ३ वर्षांपर्यंतचीच शिक्षा होऊ शकते. अशा गुन्ह्यांमध्ये थेट अटक करता येत नाही. संबंधितांना आधी नोटीस द्यावी लागते. नोटीस न स्वीकारल्यास दोन आठवड्यांपर्यंत वेळ वाढवता येतो. मात्र, पोलिसांनी हे नियम पाळले नाहीत. त्यांनी थेट अटक केली. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी ॲड. घाणेकर यांनी केली.