संजय शिरसाटांचा पाय खोलात, शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस


विशाल करोळे, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. एकीकडे हॉटेल विट्स प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. स्वतः शिरसाट यांनी याची कबुली दिली आहे. वाढलेल्या संपत्तीबद्दलचा खुलासा शिरसाटांकडून मागण्यात आला आहे. 

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अनेक आऱोप करण्यात आलेत. विट्स हॉटेलच्या खरेदी प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप शिरसाटांवर झालाय. तर त्यावर उच्च्स्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. आता संजय शिरसाट यांनी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.  2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली याचा खुलासा करण्यासंदर्भात आयकरने शिरसाट यांना नोटीस बजावली आहे. स्वतः शिरसाट यांनीच यासदर्भात कबुली दिली आहे.

तर काहींनी माझ्याविरोधात तक्रार केली होती. त्यामुळेच आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचं म्हणत शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. तर आपण नोटीसीला योग्य ते उत्तर देणार असल्याचंही शिरसाट म्हणाले आहेत. तर शिरसाटांच्या संपत्तीसंदर्भात सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचं एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी म्हटलंय.. तर पुन्हा एकदा एमआयडीसीतील भुखंडावरून जलिल यांनी संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.

दुसरीकडे आपल्याला आलेल्या आयकरच्या आलेल्या नोटीसीसंदर्भात बोलताना संजय शिरसाट यांनी खासदार श्रीकांत शिंदेंनाही नोटीस आल्याचं विधानही शिरसाट यांनी केलं होतं.  मात्र त्यावरून माध्यमांमध्ये बातम्या सुरू झाल्यानंतर संजय शिरसाटांनी घूमजाव केला आहे. 

मागील काही दिवसांपासून संजय शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. एकामोगोमाग एक असे अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शिरसाटांवर विरोधकांनी डागले आहे. एकीकडे शिरसाट या आरोपांच्या घेऱ्यात अडकले असतानाच आता त्यांना आयकरची नोटी आलीय. त्यामुळे शिरसाटांच्या पाय आणखी खोलात गेला आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24