कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने आयकरची नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉटेल, प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.
.
संजय शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग असेल इतर विभाग असतील हे त्यांचे काम करत आहे. त्यांचे काम करत आहे, त्यात काही गैर नाही. 2019 आणि 2024 मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ यावर स्पष्टीकरण मागितले आहे, ते त्यांचे काम करत आहेत.
संजय शिरसाट म्हणाले की, काही लोकांना वाटते की राजकीय पुढाऱ्यांना काही कारवाई होत नाही, असे काही नाही. आयकर विभागाने त्यांचे काम करत मला नोटीस दिली असून मी त्याला उत्तर देणार आहे.
हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत