निमंत्रण पत्रिकेवरून आता महायुतीत वादाची ठिणगी, रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत निर्माण झाला वाद


प्रफुल पवारसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास रायगड: रायगडमध्ये महायुतीत पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. मात्र, हा वाद भाजप आणि राष्ट्रवादीत निर्माण झालाय. रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आलीय. शिंदेंच्या शिवसेनेनं देखील या निमंत्रण पत्रिकेवरून राष्ट्रवादीला कोंडीत पकडलंय. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात. 

रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी शेलक्या शब्दात नाराजी व्यक्त केलीय. या निमंत्रण पत्रिकेत केवळ मंत्री आदिती तटकरे , खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याव्यतिरिक्त कुठल्याही लोकप्रतिनिधींचे नाव नव्हतं. त्यामुळे धैर्यशील पाटलांनी यासंदर्भात
नाराजी व्यक्त तटकरेंवर टीका केली होती.

धैर्यशील पाटलांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीकडून लगेचच निमंत्रण पत्रिकेत बदल करण्यात आलाय. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केल्याने जिल्ह्यात महायुतीत आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. तसंच भाजपच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून देखील पलटवार
करण्यात आलाय.

रायगडमध्ये महायुतीत सुरू असलेल्या वादावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील टोला लगावला आहे. भाजपला जसं जवळ केलं तसं अपमानाला देखील गोड मानून घ्या असा खोचक टोला सपकाळांनी लगावलाय.

 

रायगडमधील महायुतीमधला वाद सर्वश्रूत आहे. शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्रिपदावरून मागील अनेक दिवसांपासून वाद सुरूय. तर दुसरीकडे रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजपनं देखील नाराजी दर्शवली. मात्र, भाजपच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीकडून लगेचच वादावर पडदा टाकण्याचं काम करण्यात आलं.. मात्र, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी असं करताना अजिबात दिसत नाही. त्यामुळे शिंदेंना दाद नाही आणि भाजपसोबत वाद नाही ही राष्ट्रवादीची भूमिका आहे का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय…





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24