Uddhav Thackeray : मराठी माणूस आणि गिरणी कामगारांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत. शिवसेना UBTआणि मनसेनं गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं गिरणी कामगारांच्या आजझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा दिला. गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरं द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय.
शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं?
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर कायम एक आरोप होतो शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं. हा आरोप अर्थातच खोटा आहे. माझं सरकार जर यांनी पाडलं नसतं तर, साहजिकच यांना सर्व गिरणी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, पोलिसांनादेखील घरं द्यायला सुरुवात केलीच होती. पण विशेषत: गिरणी कामगारांना मुंबईत घरं दिली असती. आज आमची हीच मागणी आहे, एका बाजूला गिरणी कामगार हा मुंबईबाहेर फेकला जातोय. त्यांना सेलू आणि वांगणीला पाठवलं जातंय. धारावीच्या माध्यमातून अदानींना अख्खे मुंबई आधण दिली जातेय.
तर आमची मागणी आहे की, गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या आणि अदाणींचं टॉवर सेलू आणि वांगणीला उभी करा. जाऊ द्या देवनार डम्पिंग ग्राउंडवर अदानीने टॉवर उभारले तरी काही हरकत नाही. त्यांना तिथं टॉवर हवं तर करुन द्या. नाही तरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालाच आहे. तो टीडीआर त्यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवर आणि शेलू, वांगणीवर वापरावा. पण ज्यांनी हक्काने मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे पाठवण्याऐवजी त्यांना धारावीत घरं द्या. आदानीला कुर्ला मदर डेरीची जमीन दिली आहे, तिथे गिरणी कामगारांना घरे द्या. आणि अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही.
शिक्षकांच्या आंदोलनावर काय बोलले उद्धव ठाकरे?
विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे म्हणाले की शिक्षकांना आम्ही न्यायासाठी सोबत असल्याचे वचन दिलं आहे. कामगारांचा संप अजूनही तांत्रिक दृष्ट्या सुरू आहे. त्यांना इतर काम देऊन वेडवाकडं वापरून घेतात. मराठीचा मुद्दा आता गरम झालाच आहे. फक्त हिंदी सक्तीचा जीआरला विरोध करुन चालणार नाही. मराठी माणूस आता एकवटला आहेच. आमचा कोणता भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे.
मराठी माणसाच्या मुळावर येणा-यांना मुळासकट उखडून टाकू!
मराठी माणसासाठी आम्ही ठाकरे बंधू शनिवारी एकत्र आलो असं उद्धव यांनी म्हटलं. मराठी माणसाच्या मुळावर येणा-यांना मुळासकट उखडून टाकू असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिलाय.