भंडारा शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने तांडव केला असून बुधवारी (दि. 9 जुलै) मुसळधार सरी बरसत होत्या. गेल्या 24 तासात 114.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी (दि. 9 जुलै) सकाळपासून पावसाने दमदार बरसने सुरु केले. दर
.
दरम्यान, मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून मंगळवार (दि. 8 जुलै) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आणि भंडारा जिल्हा वासियांची झोप उडाली. सलग 12 तासांपासून पडत असलेल्या धो-धो रस्ते पाण्याखाली गेले. नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गावा-खेड्यात, सोसायटी व वस्ती भागात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार सरी जलमय भंडारनगरी
अतिवृष्टीमुळे शहराच्या हाकेवर असलेला कारधा जुना पूल पाण्याखाली बुडाला. शहर आऊटरच्या सखल भागात पाणी साचले असून पुराचा वेढा बसल्यासारखी स्थिती आहे. गणेशपूर, भोजापूर, मेंढा व समतानगर फेज द्व भागातील नाल्यांना प्रचंड उफान आला आहे. सलग चार दिवस सुरू असलेल्या पावसाने भंडारा शहरातील खात रोड, शास्त्री चौक, भोजापूर याठिकाणी पाणी साचले आहे. तर लाखांदूर तालुक्यातील राजऩी गावातील ग्रामपंचायत मध्ये पाणी घुसल्याने ग्रा. पं. मधील कागदपत्रे ओली झाली आहेत. तसेच तालुक्यातील विरली (बु.) येथे घरांची पडझड झाली आहे. तुमसर तालुक्यातील पाथरी येथे कोसळलेल्या मुसळधार पावसाने एका शेतकऱ्याचे घर जमीनदोस्त झाले. पांडू मारबते यांचे कच्चे घर अक्षरक्षः कोसळून मातीच्या ढिगाऱ्यात परिवर्तित झाले. सततच्या धो- धो बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील गावागावातील जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. नदी- नाले भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुसळधार सरी जलमय भंडारनगरी अशी स्थिती असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटला
चुल्हाड (सिहोरा) बाउनथडी नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या महाराष्ट्र – मध्य प्रदेश आंतरराज्यीय पुलावरून मंगळवारी सकाळपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. बाउनथडी नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत असल्याने सिहोरा गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

हे ग्रहण केव्हा दूर होईल
गेल्या दहा वर्षांपासून गावात थोडा जरी पाऊस पडला किंवा नदी गोसे कालव्याचा पाणी जास्त आला तरी लाखांदूर तालुक्यातील राजनी गावाची ग्रामपंचायत पाण्यात बुडने हे नेहमीचेच झाले आहे. मागील वर्षीच्या पावसात तर ग्रामपंचायतचे संपूर्ण कागदपत्रे ही पुराच्या पाण्यात तरंगत होती. या वर्षी उपसरपंच गोपाल तऱ्हेकार यांनी पूर्व कल्पना घेऊन ग्रामपंचायत मधील कागदपत्रे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साह्याने टेबल व सज्जावर ठेवून त्यांची जपणूक केली. हे असे नेहमीचेच असल्यामुळे सरपंच संदीप मेश्राम व उपसरपंच गोपाल तऱ्हेकार यांनी शासन व प्रशासन यांच्या नेहमी लक्षात आणून देखील यावर कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे हे ग्रहण कधी दूर होईल या प्रतिक्षेत राजनीवासी आहेत.

पोलखोल – पाहिल्याच पावसात रस्त्यावरचा पूल गेला वाहून अनेक ठिकाणी झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या किंवा पुलाच्या कामांची पोलखोल पावसाळ्यात होत आहे. पाहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्ते किंवा पूल वाहून गेल्याच्या घटना घडत आहे. भंडाऱ्यात सुद्धा अशीच एक घटना समोर आली आहे. भोजपूर येथील रस्त्यावरील पूल बुधवारी (दि.9 जुलै) सकाळी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. एम्प्रेस सिटीकडे जाणारा भोजपुर कॅनल मार्गावरील व्यंकटेश नगर फेज १ ही नवीन कॉलनी खात मार्गावर बांधण्यात आली. साधारण जानेवारी महिन्यात बांधकाम करण्यात आलेला या रस्त्यावरील पूल आज वाहून गेला.

प्रमुख रस्ते पाण्याखाली
- भंडारा जिल्ह्याला 24 तासांसाठी रेड अलर्ट
- जिल्ह्यात सर्वदूर अति जोरदार ते मुसळधार पाऊस
- पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
- प्रशासन आणि हवामान विभागाकडून सतर्कता
- पाणी धो- धो बरसल्याने वस्ती, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले
- नदी – नाले दुधडी भरून वाहू लागल्याने; प्रमुख रस्ते पाण्याखाली
- आतापर्यंत जिल्ह्यातील 81 मार्ग वाहतुकीसाठी बंद
- नागरिकांना सतर्कतेचा इशारा