संजय गायकवाडांकडून आमदार निवासातील कॅन्टीनचालकाला मारहाण; निकृष्ट जेवण दिल्यानं…


मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : (Mumbai News) विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असल्यामुळं राज्यातील सर्वच आमदार सध्या मुंबईत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच अधिवेशनकाळात अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. पण, त्यातच एक अशी घटना समोर आली ज्यामुळं वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड चर्चेत आले आहेत आणि यावेळीसुद्धा कारण ठरला आहे व्हायरल होणारा त्यांचा एक व्हिडीओ. 

आमदार निवास आकाशवाणी येथील खानावळीत निकृष्ट जेवण दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा येथील (MLA Sanjay Gaikwad) आमदार संजय गायकवाड यांनी खानावळ चालकाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे, तर त्याचसोबत कामगार आणि मॅनेजर यांना मारहाणही केल्याचं पाहायला मिळालं. 

संजय गायकवाडांचा आमदार निवासात राडा

मंगळवारी रात्रीच्या सुमारास विधीमंडळातील कामकाज संपवून संजय गायकवाड जेव्हा आमदार निवासात गेले तेव्हा त्यांनी काही जेवण मागवलं होतं. उपलब्ध माहितीनुसार गायकवाड यांच्यासोबत इतरही काहीजण तिथं जेवणासाठी होते. त्यांच्याकडूनही तिथं देण्यात येणाऱ्या डाळीला वास येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र कॅन्टीनच्या मॅनेजरनं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. 

याचदरम्यान गायकडवाडांनीही जे जेवण मागवलं होतं, त्यातही डाळ खराब झाल्याचं लक्षात आलं ज्यामुळं त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. त्याच्याकडून व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याचं पाहून गायकवाडांनी त्याच्यावर हात उगारला. आमदार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा इतका निकृष्ट असल्याची शहानिशा झाल्यानंतर गायकवाड यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आणि त्यासंर्भात अन्न व प्रशासन विभागाकडेही यासंदर्भातील, कॅन्टीन चालकाची तक्रार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : ‘गटार थोबाडाच्या दुबेचे बोलवते धनी मोदी व शहाच’, ठाकरेंच्या सेनेचा घणाघात; म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या गादीवर..’

आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणासंदर्भात याआधीसुद्धा तक्रार करण्यात आली होती. विधानभवनातही आवाज उठवला जात होता. मात्र चालकानं  ही सेवा सुधारली नसल्यानं गायकवाडांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी कॅन्टीन चालकावर हात उगारल्याचं पाहायला मिळालं. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24