समाजकल्याण जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी वसतिगृहातील कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्याकडून स्वतःसह आईची मसाज, घरगुती कामे करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ पुराव्यादाखल पीडित महिलेने समाजकल्याण आयुक्ता
.
समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह युनिट क्र.४ मध्ये पीडित महिला सफाई कामगार म्हणून काम करते. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की वसतिगृहाच्या गृहप्रमुख वैशाली काळसरे यांच्या सांगण्यावरून पीडित महिलेला सोनकवडे यांच्या घरी कामासाठी पाठवण्यात येत होते. तिथे तिच्याकडून घरातील कामे करून घेतली जात होती. फरशी पुसणे, फ्रिज साफ करणे आदी कामे करून घेतली जात होती. ही कामे झाल्यानंतर मॅडम स्वतःची व त्यांच्या आईची मसाज करायला लावत असल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. सततच्या मेहनतीमुळे पीडिता शारीरिकदृष्ट्या त्रस्त झाली आहे.
कामावरून काढण्याची दिली जायची धमकी
काम न केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती. याआधी त्यांच्या घरी काम करणाऱ्या तीन महिलांना हटवले गेले असे या महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारीत म्हटले.
सोनकवडेंची पार्श्वभूमी
२०२२-मार्च २०२५ या कालावधीत समाजकल्याण विभागाच्या उपायुक्त पदावर कार्यरत होत्या. मार्च २०२५ मध्ये त्यांची प्रशासकीय बदली झाली. सध्या त्या जात पडताळणी समितीच्या उपायुक्त पदावर कार्यरत आहेत.
गंभीर दखल घ्यावी : या प्रकरणाची चौकशी करण्याची करावी, समाजकल्याण विभागाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा तक्रारदार महिलांनी केली आहे.
महिलेविरोधात पोलिसात तक्रार
माझ्याविरोधात हे षड्यंत्र आहे. काहींना माझ्या पदाचा चार्ज हवा आहे. मी सध्या मॅटमध्ये गेलेले आहे. त्या कारणाने हा खटाटोप सुरू आहे. संबंधित महिलेविरोधात पोलिसामध्ये तक्रार दिली. पोलिस चौकशी करतील. -जयश्री सोनकवडे, उपायुक्त, जात पडताळणी समिती