Top 10 Richest People in Mumbai : मुंबईत मराठी भाषेवरुन वाद पेटला आहे. मराठी भाषेला विरोध करणाऱ्या तसेच मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना सक्ती केली जात आहे. इतकचं नाही तर मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्यांना मारहाण देखील केली जात आहे. मात्र, मराठी माणसांबाबत धक्कादा.क वाल्तव समोर आले आहे. मुंबईच काय संपूर्ण महाराष्ट्रातील TOP 10 श्रीमंताच्या यादीत एकही मराठी माणूस नाही. मराठी माणूस आहे तरी कुठे? TOP 10 श्रीमंताच्या यादीतील नावे वाचून असाच पश्न पडेल.
महाराष्ट्रातील TOP 10 श्रीमंताच्या यादी जाणून घेऊया
1 मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सर्वात मोठे शेअरहोल्डर मुकेश अंबानी हे जगातील १८ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स देशात पेट्रोकेमिकल्स, तेल, नैसर्गिक वायू उत्खनन, दूरसंचार आणि किरकोळ विक्रीचा व्यवसाय करते. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सध्या 94.1 अब्ज डॉलर्स आहे. ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
2 गौतम अदानी
गौतम अदानी हे सध्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील 25 वे सर्वात मोठे उद्योगपती आहेत. ते अदानी ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत . अदानी ग्रुप देशात बंदरे, विमानतळ, वीज निर्मिती आणि ट्रान्समिशन आणि हरित उर्जेवर वेगाने काम करत आहे. 2024 मध्ये, त्यांच्याविरुद्ध हिंडेनबर्ग रिसर्च आणि अमेरिकन अभियोक्त्यांकडून लाचखोरीचे आरोपही लावण्यात आले होते. या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आणि त्याचा परिणाम त्यांच्या संपत्तीवरही दिसून आला. अंबानींप्रमाणेच, अदानी देखील 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर पडले आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 63.3 अब्ज डॉलर्स आहे.
3 दिलीप संघवी
सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक दिलीप संघवी हे देशातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची फार्मा कंपनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाते. सध्या त्यांची एकूण संपत्ती29.9 अब्ज इतकी आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 60 व्या क्रमांकावर आहेत.
4 सायरस पूनावाला
सायरस पूनावाला हे पुण्यातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. सायरस पूनावाला हे देशातील सहावे सर्वात मोठे उद्योगपती आहेत. जगातील 100 श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा 90 वा क्रमांक आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक यांनी कोविशिल्ड लसीने जगभरात प्रसिद्धी मिळवली. जागतिक लस उत्पादक सायरस पूनावाला यांचे लक्ष संपूर्ण जगासाठी लस उत्पादनावर आहे. त्यांची एकूण संपत्ती सध्या 21.5 अब्ज डॉलर्स आहे.
5 कुमार बिर्ला
देशातील सातवे सर्वात मोठे उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला हे आहेत. ते आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष आहेत. ते देशातील आघाडीच्या आणि प्रभावशाली उद्योगपती कुटुंबांमध्ये गणल्या जाणाऱ्या प्रसिद्ध बिर्ला कुटुंबातील आहेत. कुमार बिर्ला यांची एकूण संपत्ती सध्या 21.2 अब्ज डॉलर्स आहे.
6 कुशल पाल सिंग
कुशल पाल सिंग हे देशातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. ते एक इस्टेट डेव्हलपर आहेत आणि डीएलएफ लिमिटेडचे अध्यक्ष देखील आहेत. देशातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या डीएलएफचे अध्यक्ष आहेत. त्यांची सध्याची एकूण संपत्ती 18.1 अब्ज डॉलर्स आहे. ते जगातील 106 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
7 राधाकिशन दमानी
2024 मध्ये राधाकृष्ण दमानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. ते भारतातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते अब्जाधीश गुंतवणूकदार, उद्योगपती आणि अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे संस्थापक आहेत. अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड देशातील लोकप्रिय रिटेल चेन डी-मार्ट चालवते. राधाकृष्ण दमानी हे डी-मार्टचे संस्थापक देखील आहेत. राधाकृष्ण दमानी यांची एकूण संपत्ती सध्या 15.8 अब्ज डॉलर्स आहे.
8 सत्यनारायण नुवाल
सत्यनारायण नुवाल हे सोलर इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. सोलर इंडस्ट्रीज कंपनी औद्योगिक स्फोटके (Industrial Explosives) आणि दारूगोळा बनवते. सध्या 65 पेक्षा अधिक देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय विस्तारलेला आहे. सत्यनारायण नुवाल हे सध्या 4.4 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 3,80,28,10,00,000 रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
9 पराग शाह
भाजप आमदार पराग शाह यांच्याकडे 3,315 कोटींची जंगम आणि 67 कोटींची अचल मालमत्ता आहे. स्वतःच्या नावावर 2,179 कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1,136 कोटींची संपत्ती आहे. पराग शाह हे रिअल इस्टेट बिल्डर आहेत आणि मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही बांधकाम कंपनी चालवतात. पराग शाह हे शाह हे एमआयसीआय ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत.
10 मंगलप्रभात लोढा
मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील मलबार हिलचे आमदार आहेत. मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 441 कोटी इतकी आहे.