भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुण्यात झालेल्या हिंदुत्ववादी मोर्चात भाषण करताना त्यांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता अत्यंत खालच्या स्तरावर टीका केली. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच, प
.
सांगलीतील ऋतुजा पाटील या विवाहितेने धर्मांतराच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि ऋतुजा पाटील हिला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात भाषण करत असताना पडळकरांनी नाव न घेता आपला रोख स्पष्टपणे पवार कुटुंबाकडे वळवला. गोपीचंद पडळकरांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नेमके काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
“एका गटाचे लोक एका मोर्चामध्ये पुढे पुढे करत आहेत. ते घर पण तसेच आहे. संकष्टीच्या दिवशी उपवास असतो, त्या दिवशी घरामध्ये मटण आणायचे. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. त्या घरातील लोक एकादशीच्या दिवशी दगडू शेठ गणपतीला मटण खाऊन जातात. तुम्हाला माहिती आहे ते घर कोणते आहे. तिची सासू खिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच आहे. असे ते कॉकटेल कुटुंबीय आहे.” असे गोपीचंद पडळकर म्हणालेत.
मंगळसूत्र चोराची पवारांवर बोलण्याची लायकी नाही
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “गोपीचंद पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. अशांची पवार कुटुंबीयांवर बोलण्याची लायकी नाही, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे. ज्यांची ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याची लायकी नाही अशांना भाजपकडून पदं दिली जातात आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर अशा शब्दात बोलायला लावले जाते. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली जनता त्याला योग्य ते उत्तर देईल, असे म्हणत प्रशांत जगताप यांनी भाजपवरही निशाणा साधला.
सत्ताधाऱ्यांकडून कोणतेही नियंत्रण नाही
गोपीचंद पडळकर यांची ही पहिली वादग्रस्त टीका नाही. याआधीही त्यांनी पवार कुटुंबीयांविरोधात अनेकदा गलिच्छ आणि वैयक्तिक टीका केली आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्या वक्तव्यांवर कोणतेही नियंत्रण आणले नसल्याचे सातत्याने दिसून येत आहे. गोपीचंद पडळकरांच्या या टीकेवरून आता वाद होण्याची शक्यता आहे.