ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास : संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या टेंडर प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिलेत. अंबादास दानवेंनी या प्रकरणात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत. आता विट्स हॉटेलच्या या चौकशीच्या आदेशानंतर शिवसेनेनं मात्र यावर सारवासारव केल्याचं पाहायला मिळतं.
छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या लिलावावरून अंबादास दानवे यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोपांच्या फैरी डागल्या होत्या. सोमवारी विधानपरिषदेत या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाली होतं… यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल विट्सच्या टेंडर प्रक्रियेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.. त्यामुळे हॉटेलचा लिलाव घेणारे संजय शिरसारांचे सूपूत्र सिद्धांत शिरसाटांच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच आता या चौकशीच्या मुद्द्यावर शिवसेनेने सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय..
तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पुन्हा एकदा विट्सच्या टेंडर प्रक्रियेवरून अनेक प्रश्न उपस्थित करत मंत्री संजय शिरसाटांवर निशाणा साधला आहे.
तर मुख्यमंत्री मोठे ही उद्योगमंत्री मोठं असा सवाल करत एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय… तर पुढल्या काळात शिरसाटांच्या एमआयडीसी भूखंड घोटाळ्यासंदर्भातही उद्योग मंत्री उदय सामंत यांना उत्तरं द्यावी असं म्हणत जलिल यांनी सामंत यांच्यावर निशाणा साधलाय..
विधान परिषदेत सोमवारी हॉटेल विट्सवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते.. शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत भाग घेतल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला होता… दानवेंचे हे आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी फेटाळून लावले होते. या सर्व खडाजंगीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विट्स हॉटेलच्या टेंडर प्रक्रीयेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले..
आता हॉटेल विट्सच्या टेंडर आणि लिवाल प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय.. या चौकशीमुळे सिद्धांत शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र या चौकशीनंतर या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झालाय की नाही याबाबतचं सत्य समोर येणार आहे.