राज्यात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेने “महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठी बोललीच पाहिजे” असा ठाम पवित्रा घेतल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याच भूमिकेवरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्
.
याआधी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका करत, “तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू, तमिळ, तेलगू भाषिकांवरही मारहाण करून दाखवा,” असे आव्हान दिले होतं. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी देखील राज ठाकरे यांना डिवचले आहे. यावर आता ठाकरे बंधू तसेच राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
नेमके काय म्हणाले राजीव राय?
राजीव राय यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हिंदी भाषा, मराठी भाषा, बॉलिवूड तसेच राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात तुमची राजकीय ताकद निर्माण का होऊ शकलेली नाही? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? गरीब हिंदी भाषिकांसोबत गुंडगिरी करणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे, असे राजीव राय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हिंदी सिनेसृष्टीला मुंबईच्या बाहेर काढून दाखवा
तसेच, हिंदी चित्रपटांमुळे बॉलिवुडला ओळख मिळाली. याच हिंदी चित्रपटांनी तुमच्या कुटुंबाची अब्जो रुपयांची कमाई झाली. या हिंदी चित्रपटांच्या विरोधात तुम्ही का बोलत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला मुंबईच्या बाहेर काढून दाखवा, असे खुले आव्हानही राजीव राय यांनी राज ठाकरे यांना दिले. तसेच गरीब हिंदी भाषिक लोक पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात जात असतील तर हजारो मराठी कुटुंब हे हिंदी सिनेमांच्या मदतीनेच जीवन जगतात, असा दाखला राजीव राय यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे हिरो
मराठी भाषा ही संस्काराची भाषा आहे. या देशातील एखादा भाग फक्त भाषेच्या मुद्द्यावरून कोणाच्याही बापाचा होऊ शकत नाही. देशातील प्रत्येक भागावर प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तुमच्या एकट्याचे नाहीत तर ते संपूर्ण देशाचे हिरो आहेत, असेही राजीव राय म्हणाले.
राज ठाकरेंना आत्मचिंतन करण्याचा सल्ला
लक्षात ठेवा या देशाची संस्कृती अतिथी देवो भव: अशी आहे. तुम्ही करत असलेल्या गुंडगिरीवर औषध आहे. सगळं काही ठीक होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही थोडं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असा सल्लाही राजीव राय यांनी राज ठाकरे यांना दिलाय.
दरम्यान, राजीव राय यांच्या टीकेनंतर मनसेची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा…
मनसेचा मराठी स्वाभिमान मोर्चा:पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलन यशस्वी; मराठी माणसाच्या नादी लागाल तर याद राखा, अविनाश जाधव यांचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मीरा भाईंदर मध्ये काढण्यात आलेल्या मराठी स्वाभिमान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर पोलिसांच्या विरोधाला झुगारुन मनसेने हा मोर्चा काढला. मनसे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, उद्धव ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर, माजी खासदार राजन विचारे हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. अखेर अविनाश जाधव यांनी अमराठी व्यापाऱ्यांना इशारा देत हा मोर्चा थांबवत असल्याचे जाहीर केले. पूर्ण बातमी वाचा…