भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत बाईक स्वाराचा मृत्यू; अहिल्यानगर- पुणे महामार्गावर भीषण अपघात


Suresh Dhas Son Car Accident : अहिल्यानगर- पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भाजप सुरेश धस यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत बाईक स्वाराच्या मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघात नेमका कसा झाला याचा पोलिस तपास करत आहेत. या अपघातात कारची अवस्था खूपच भयानक झाली आहे. 

नितीन शेळके असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.  आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने या दुचाकीस्वाराला धडक दिली. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान अहिल्यानगर- पुणे महामार्गावर  हा अपघात घडला आहे.   या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. दुचाकीस्वार हा जातेगाव फाट्याकडून रास्ता ओलांडत असतांना सागर धस याच्या वाहनाने जोराची धडक यात या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

 स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले

अंबरनाथमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या स्कूल व्हॅनमधून काही विद्यार्थी पडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. अचानक भरधाव स्कुल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे स्कुल व्हॅन चालकाच्या हा प्रकार लक्षातही आला नाही. आणि तो तिथून निघून गेला. मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या संपूर्ण घटनेनंतर बेजबादार स्कूल व्हॅन चालकाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

गोंदिया जिल्ह्यातील वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य जिवचंद बिसेन यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. वडेगाव बिरसी मार्गावर ग्राम सातोना जवळील पावर हाऊस जवळील टर्निंग पॉईंट जवळ अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्याकरिता दुचाकीने वडेगाव येथून बिरसी कडे जात असताना सातोना जवळील पावर हाऊस जवळील झाड अंगावर पडून जागीच मृत्यू झाला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24