महाराष्ट्राचे राजकारण डायरेक्ट 360 डिग्री अँगलने बदलणार! एकत्र आल्यानंतर ठाकरेंची पहिल्यांदाच सरकारविरोधात मोठी खेळी!


Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance : महाराष्ट्राचे राजकारण डायरेक्ट  360 डिग्री अँगलने बदलणार आहे. एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सरकारविरोधात मोठी खेळी खेळण्याची रणनिती आखली आहे. याची सुरुवात पुन्हा एकदा मोर्चाने होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे  पुन्हा एकदा एकत्रित येणार आहेत. फक्त एकत्र येणार नाहीत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे  रस्त्यावर उतरणार आहेत. 

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.  उद्धव ठाकरे उद्या गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.  उद्धव ठाकरे उद्या 12 वाजता आझाद मैदानात गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.  मुंबईत असल्यास मोर्चात सहभागी होईन, अथवा बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होतील असं राज ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या संघटनांना सांगितल आहे.  गिरणी कामगार उद्या मुंबईत हक्काचं घर मिळावं तसंच इतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत. मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केल्यानंतर सरकारने हिंदी भाषे संदर्भातील GR च रद्द केला होता. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24