एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंचा घरात लावलेला फोटो काढून टाकावा. कारण त्यांच्या पक्षाचा अमित शहांच्या पक्षाचा एक निशिकांत दुबे नावाचा माणूस मराठी माणूस आणि महाराष्ट्राविषयी काय बोलत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य
.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, मराठी माणूस महाराष्ट्रात राहतो आधि खातो तुझ्या बापाचे खात नाही हे निशिकांत दुबेंनी लक्षात ठेवावे. 50 पोलिस घेऊन फिरतो एका पटवणीचा नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे. दुबे हा दलाल माणूस आहे, याची अनेक ठिकाणी दलाली चालते. सुप्रिया सुळेंना विचारु शकतात. त्यांची डिग्री बोगस असून ते उद्योजकांकडून खंडणी वसूल करतात.
दुबेंकडे बोगस डिग्री
संजय राऊत म्हणाले की, दुबे संसदेमध्ये दिल्ली विद्यापीठाचे बोगस डिग्री सादर करतात, अशा व्यक्तीने आम्हाला देश आणि राज्याबद्दल बोलू नये. महाराष्ट्रात हिंदी बांधव गेली अनेक वर्षे राहतात, त्यांची आणि आमचे संबंध चांगले आहे, आम्ही राजकारण करत नाही. ते आमच्यासोबत असावे असे आम्हाला वाटते. त्यासाठी आम्ही चर्चा करु. हिंदी बांधवाला आम्ही कधीच मारहाण केली नाही, हे दुबेंना समजले पाहिजे. त्यांना राजकारण करायचे आहे. दुबे आहेत कोण त्यांना कुणी अधिकार दिला मराठीबद्दल बोलण्याचा? इथल्या हिंदी भाषिक नेत्यांनी दुबेंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे.
शिंदेंनी राजीनामा देत मोदी-शहांना प्रश्न करावा
संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा एक खासदार बिहारमध्येबसून मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल चुकीचे वक्तव्य करतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ काहीच बोलत नाही. फडणवीस सरकारला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे स्वत:ला खोट्या शिवसेनेचा नेता म्हणवतात, नेहमी दाढीवर हात फिरवत असतात, त्यांनी दाढी काढून टाकली पाहिजे, त्यांच्यामध्ये दम नाही. शिंदेंनी राजीनामा देत मोदी-शहांना महाराष्ट्राबद्दल काय सुरू आहे असा प्रश्न विचारावा.
डुप्लीकेट शिवसेना आहे कुठे ?
संजय राऊत म्हणाले की, मला तरं भिती वाटते, मराठी माणसावर मोराराजी भाईंप्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले, त्यांचा रेकॉर्ड मोडतील अशा प्रकारच वर्तन फडणवीस करत आहेत. पहाटे मनसेचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी अविनाश जाधव, शिवसेनेच काही प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. या सर्वांना नोटीसा बजावल्या. मोर्चा काढू नका, मग त्यांना ताब्यात घेतले. तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरुन खाली खेचून हुतात्मा चौकात आणले पाहिजे. डुप्लीकेट शिवसेना कुठे आहे? अर्ध्या दाढीवरुन हात फिरवणारे, अर्धी दाढी कापून अर्ध्या दाढीत महाराष्ट्रात फिरवेल, इतकी जनता चिडली आहे. कुठे आहेत शिवसेने शिवसेना म्हणता, आमचीच खरी शिवसेना. मग, अमित शाहला विचारायला पाहिजे का?. दुबेचा किती लोकांनी निषेध केला.