Plastic Flower: देशात प्लास्टिकची फुलं मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आलीयत. दरम्यान याच मुद्द्यावर सभागृहात आज चर्चा झाली. प्लास्टिकच्या फुलांचा फुल उत्पादक शेतक-यांना फटका बसत असल्याचं आमदार महेश शिंदे यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांनी उपस्थितीत केलेल्या या सवालानंतर विरोधकांनी कृषीमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सवाल उपस्थित केलेत.
महाराष्ट्राच्या अर्थकारण, आरोग्य आणि पर्यावरण विभागाशी संबधित लक्षवेधी उपस्थिती केली. 11 हजार ते 20 हजार हेक्टरवर फुलशेती, 2 हजार कोटींचा फुलशेतीचा व्यवसाय, परदेशातून मोठ्या प्रमाणालर प्लास्टिक फुलांची शेती आयात होते. पॉलिहाऊससाठी पन्नास लाखांचं कर्ज घेतली जातात, अशी माहिती देण्यात आली.
प्लास्टिक फुलांचे दुष्परिणाम
प्लास्टिक फुलांत रंग वापरले जातात. वापरात कॅन्सरसारखे आजार रक्त आणि फुप्फुसांचे कॅन्सर होतो. फुलशेतीच्या माध्यमातून मधमाशापालन करुन परागाभवनाची नैसर्गिक प्रक्रिया होते मात्र फुलशेती नष्ट होत असल्याने कृत्रिमरित्या परागीभवन करून पुन्हा कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण दिलं जायतं. नॅशनल हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून फुलशेतीला प्रोत्साहन दिलं जातंय.मात्र सरकारचंचं धोरण फुलशेती शेतक-यांना मारक ठरतंय.
धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील याप्रश्नी आक्रमक झाले. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांनी सभागृहाकडे आग्रह धरला. पर्यावरणमंत्रीही उपस्थित आहेत तर या संदर्भात निर्णय घ्यायला अडचणी काय आहेत? असा प्रश्न उपस्थित केला.
कृषी विभागाचा प्रश्नाला फलोत्पादन मंत्री उत्तर का देतात? हा मुद्दा उपस्थित करत कृषीमंत्री माणिकराव ठाकरे का उपस्थित नाहीत? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
तर फलोत्पादनमंत्री भरत गोगावलेंनी कृषिमंत्र्यांची बाजू सावरत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीला गेल्याची सारवासारव केली. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे, शेती अर्थकारणासंदर्भातले महत्वाचे प्रश्न उपस्थित होत असताना कृषीमंत्री उत्तर देण्यासाठी सभागृहात नाहीत, मात्र शेतकऱ्याची शेती नफ्यात आणण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज लागणार आवश्यक आहे.
100 मजूरांच्या खात्यातून 100 कोटींचा घोटाळा
गावात रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुकांच्या बँकेत खाते उघडून त्यात मार्च ते जून 2025 या तीन महिन्यात तब्बल 100 कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे. यवतमाळच्या पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झालेली ही उलाढाल काळा पैसा पांढरा करण्यासाठी झाल्याचा आरोप आहे. चोपण, वाघोली, वसंतनगर, दहेली तांडा या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार, मयूर चव्हाण याने आधार कार्ड आणि विविध कागदपत्र घेतले होते. त्यानंतर गावातीलच रहिवाशी किरण राठोड याच्या खात्यात एक कोटी 16 लाख रुपये आले. इतके पैसे पाहून रहिवाशीही विचारात पडला. मात्र काहीच वेळात ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाल्याची माहिती मिळाली. हा प्रकार माजी नगराध्यक्ष संतोष बोरेल यांना समजताच त्यांनी बँकेकडे विचारणा केली. असाच प्रकार शेकडो खात्यांमध्ये झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पांढरकवडा पोलीसांकडे या प्रकरणी तक्रार दिली मात्र पोलीसही कारवाई करीत नसल्याचा आरोप बोरेल यांनी केला आहे.