Nothing Phone 3: नथिंगने भारतीय बाजारात त्यांचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन नथिंग फोन 3 लाँच केलाय. हा स्मार्टफोन फोन 1 आणि फोन 2 पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याची डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आलीय. या फोनच्या मागील बाजूस Glyph Matrix जोडण्यात आलाय. जो iPhone च्या डायनॅमिक आयलंडप्रमाणे काम करेल. असे असले तरी नथिंग फोनच्या फिचर्समध्ये फारसा बदल झालेला नाही. यात फ्लेक्सिबल अमोलेड डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी आहे. याचे आणखी फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
नथिंग फोन 3 च्या डिझाइनमध्ये फोन 2 पेक्षा वेगळे काय?
कंपनीने नथिंग फोन 3 च्या डिझाइनमध्ये पूर्णपणे बदल केला आहे. ग्लिफ मॅट्रिक्स डिझाइन सर्वात खास आहे. वेगवेगळ्या टूल्स म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच ग्लिफ मिरर म्हणून देखील वापरले जाऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला मागील डिस्प्लेद्वारे परिपूर्ण सेल्फी काढता येतो. यात डिजिटल घड्याळ, बॅटरी इंडिकेटर, स्टॉपवॉच आणि इतर अनेक गोष्टी मिळतात. नव्या फोनमध्ये कॅमेऱ्याचे प्लेसमेंट पूर्णपणे बदलण्यात आले आहे.
नथिंग फोन 3 चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.67-इंचाचा फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे आणि रिझोल्यूशन 1260 x 2800 पिक्सेल आहे. नथिंगचा हा फोन स्नॅपड्रॅगन 8एस जेन 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीने त्यात 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनी फोनसोबत 5 वर्षांपर्यंत अँड्रॉइड अपडेट आणि 7 वर्षांपर्यंत सिक्युरिटी पॅच अपडेट देत आहे.
नथिंग फोन 3 चे कॅमेरा फीचर्स
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50 एमपी पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5500 एमएएच आहे, ज्यामध्ये तुम्हाला 65 वॅट फास्ट चार्जिंग मिळते. यात 15 वॅट वायरलेस चार्जिंग आणि 7.5 वॅट रिव्हर्स वायर्ड चार्जिंग आणि 5 वॅट रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला आयपी 68 रेटिंग मिळते. सुरक्षेसाठी त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
नथिंग फोन 3 ची किंमत आणि ऑफर
कंपनीने नथिंग फोन 3 लाख 79 हजार 999 रुपयांना लाँच केलाय. ही किंमत त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. त्याच वेळी त्याच्या 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89 हजार 999 रुपये आहे. त्याची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. प्री-बुकिंग सुरू झाले आहे आणि त्यावर 5 हजार रुपयांची सूट मिळत आहे.