इप्पा गँगमधील सदस्याचा जीव धोक्यात: गँगस्टरच्या पत्नीच्या मृत्यूनंतर गँग मेंबरला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडे मागितले संरक्षण – Nagpur News



गँगस्टरच्या पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या गँग मेंबरच्या जीवावर गँगमधील सदस्य उठल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतल्याची घटना नागपुरात घडली. मध्य नागपुरातील इप्पा गँगमधील एका गँगस्टरच्या २९ वर्षीय पत्नीचे अर्शद टोपी नावाच्या गँग मेंबरसोबत अनैतिक प्रेमसं

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शद टोपी आणि संबंधित महिला कोराडी माता मंदिराच्या मागील सुरादेवी मंदिराजवळ बाईकने जात होते. त्यावेळी एका जेसीबी मशिनने त्यांच्या बाईकला धडक दिली. अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती, तर टोपीला किरकोळ दुखापत झाली. टोपीने जखमी अवस्थेत महिलेला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेले. पण, तिथे तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. कामठीमधील दुसऱ्या रुग्णालयानेही तिला उपचार देण्यास नकार दिला. शेवटी, टोपीने एका ॲम्ब्युलन्स चालकाला पैसे देऊन तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेले. तिथे तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अर्शद टोपी हा जखमी महिलेसोबत एका खाजगी रुग्णालयात दिसला. तिच्या मृत्यूनंतर इप्पा गँगमध्ये तणाव वाढला. महिलेशी संबंध न ठेवण्याच्या आदेश टोपीने न पालन न केल्याचा आरोप केला आहे. टोपीनेच महिलेला मारल्याचाही संशय त्यांना आहे. गँगचे सदस्य टोपीचा बदला घेण्यासाठी त्याला शोधत आहेत.

टोपीला जीवाची भीती वाटत असल्याने त्याने पारडीमध्ये डीसीपी निकेतन कदम यांच्याकडे मदत मागितली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “मयत महिलेच्या माफिया किंग पतीने इतर शहरातील गँगशी संपर्क साधून टोपीचा बदला घेण्यासाठी मदत मागितली. एका गुप्त बातमीदाराने पोलिसांना माहिती दिली आणि शहरातील सर्व पोलीस स्टेशनला सतर्क केले.

डीसीपी कदम यांनी सांगितले की, टोपीने कोराडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन संरक्षण मागितले, पण औपचारिक तक्रार दाखल करण्यास तो तयार नव्हता. डीसीपी कदम यांनी झोनल डीसीपी राहुल मदने यांच्याशी बोलून गँगच्या सदस्यांना सूडाने कारवाई न करण्याची ताकीद दिली आहे. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे दिसत आहे, असेही कदम यांनी सांगितले. पण शहर पोलीस अजूनही हाय अलर्टवर आहेत. गुन्हे शाखा आणि कोराडी पोलीस स्टेशनसह अनेक पोलीस स्टेशन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि टोपी सुरक्षित आहे याची खात्री करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24