तरुणीवर अत्याचार करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी: तरुणाविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Hingoli News



विदर्भातील एका तरुणीवर अत्याचार करून लग्न न करता खोट्या गुन्ह्यात अडकवून जिवाचे बरे वाईट करण्याची धमकी देणाऱ्या वसमत तालुक्यातील अकोली येथील एका तरुणाविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता ७ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने तरुणाला चौकश

.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील अकोली येथील विष्णू दवणे हा नागपूर येथे शिकत होता. त्या ठिकाणी त्याची एका तरुणी सोबत ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. विष्णू याने त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवले.

दरम्यान सदर तरुणी जानेवारी महिन्यात अकोली येथे आली असताना त्याने तरुणीवर अत्याचार केला. यावेळी तिला लग्नाची आमिष दाखवले. मात्र काही दिवसानंतर त्या तरुणीने लग्न करण्याची मागणी केली असता विष्णू याने लग्नास नकार दिला. त्यानंतरही तरुणीने लग्नाबाबत तगादा लावला असता त्याने खोट्या गुन्ह्यात अडकवून जीवाचे बरे वाईट करेल अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्या तरुणीने तक्रार दाखल केली. यावरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात विष्णू दवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक ई. जी. डक, जमादार विजयकुमार उपरे, अविनाश राठोड, नामदेव बेंगाळ यांच्या पथकाने तातडीने अकोली परिसरात जाऊन विष्णू यास चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. त्याची अधिक चौकशी केली जात असल्याची पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा…

डोंगरकडा ग्रामपंचायतीच्या सरपंच अपात्र:ग्रामसभा व मासिक सभा घेतली नसल्याचे कारण, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मीराताई अडकिणे यांनी मासिक सभा व ग्रामसभा घेतली नसल्याच्या कारणावरून त्यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकताच दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…

हिंगोलीमध्ये तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल, दाती येथील घटना

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत दाती येथे तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ता. 6 सकाळी आठ वाजता उघडकीस आली आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *