New Mumbai Airport: मुंबई विमानतळावर प्रवाशांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येत आहे. पण हे विमानतळ नेमकं कधी सुरु होणार? याबद्दल प्रश्न विचारले जात होते. मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली. नवी मुंबई विमानतळ 1160 हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
सप्टेंबर अखेर नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होईल, अशी माहिती उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी मराठी भाषा मुद्द्यावरही भाष्य केले. मराठी भाषा खरा साक्षीदार मी आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना त्रिभाषा प्रस्ताव २०२२ माशेलकर समिती रिपोर्ट आला. कॅबिनेटने स्वीकारले. त्यात स्पष्ट लिहीले मराठी हिंदी इंग्रजी सक्ती पाहिजे असे त्यावेळेस म्हटल होते. सर्व विधानसभा सदस्य यांना रिपोर्ट पाठवला जाईल. रिपोर्ट सादर केला जाईल, असे यावेळी उदय सामंत म्हणाले. जे महायुती सरकारवर आता टीका करतायत त्यांनी २०२२ साली रिपोर्ट स्विकारला. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते ? त्यांनी त्यावेळेस त्रिभाषा मान्य होते आता मग का विरोध? असा प्रश्न उदय सामंतांनी विचारला.
नवी मुंबई विमानतळावरुन पहिल्या दिवसापासून 15 पेक्षा जास्त शहरांमध्ये 18 दैनंदिन उड्डाणे (36 एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरू केले जाणार आहे. सिडकोकडून नवी मुंबई विमानतळाचा विकास केला जाणार आहे. विमानतळाला चांगली कनेक्टीव्हिटी मिळावी यासाठी परिसरातील इतर मार्गाना विमानतळासोबत जोडलं जाणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू असल्याची माहिती सिडकोच्या संचालकांनी दिली. नोव्हेंबर 2025 पर्यंत 79 दैनंदिन उड्डाणे (158 एटीएम) केले जाणार असून, यामध्ये 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे.
बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि अति महत्त्वाचे नेते, मंत्री यांच्यासाठी नवी मुंबई विमानतळावर एक समर्पित असलेल्या वेगळं टर्मिनल बनविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन विमानतळाच्या व्यावसायिक उद्घाटनानंतर सुरू होणाऱ्या विस्ताराच्या पुढील टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) एक वेगळं टर्मिनल बांधण्याची योजना आखत आहे.
भारतातील सर्वात मोठे विमानतळ
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ महाराष्ट्रात उभारले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दुसऱ्या क्रमांकांचे विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांबीचा असून एकाचवेळी 350 विमाने उभे राहू शकतील इतकी या विमानतळाची क्षमता आहे. नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार आहे. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल. देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील तयार केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.
नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. तसंच, मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचारही करण्यात येत आहे.
कोणाला होणार फायदा?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) येत्या एप्रिल 2025 मध्ये कार्यान्वित होणार असून, याचा फायदा मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरातील नागरिकांना, उद्योगांना आणि अर्थव्यवस्थेला होणार आहे. हा मेगा प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करेल आणि प्रवास सुलभ करेल. पुण्यापासून नवी मुंबई विमानतळाचे अंतर मुंबई विमानतळापेक्षा कमी आहे (2 तास 20 मिनिटे विरुद्ध 3 तास 30 मिनिटे). यामुळे पुणेकरांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवास जलद आणि सुखकर होईल. लोहगाव विमानतळावर मर्यादित आंतरराष्ट्रीय उड्डाणे असल्याने NMIA पुणेकरांसाठी प्राधान्याचा पर्याय ठरेल.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील गर्दी आणि उड्डाणांचा ताण कमी होईल. NMIA च्या सुरुवातीला 20-30 लाख प्रवाशांची हाताळणीक्षमता असेल, जी 2029 पर्यंत 5 कोटींपर्यंत वाढेल. विमानतळाला मेट्रो लाइन 8 आणि नवी मुंबई मेट्रो लाइन 1 द्वारे जोडले जाईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. वॉटर टॅक्सी सुविधेमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास 17 मिनिटांपर्यंत कमी होईल. NMIA मुळे लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, ट्रेडिंग, आणि BPO क्षेत्रात कुशल आणि अकुशल कामगारांसाठी हजारो रोजगार संधी निर्माण होतील. पनवेल, उलवे, खारघर, कामोठे आणि तळोजा येथील मालमत्तांच्या किमती 10-15% वाढण्याची शक्यता आहे. विमानतळामुळे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल. विदेशी गुंतवणूक आकर्षित होईल आणि हवाई वाहतुकीची वाढती मागणी (2034 पर्यंत 100 दशलक्ष प्रवासी) पूर्ण होईल.