वसंत मोरेंची बांबू दाखवत निशिकांत दुबेंना धमकी: म्हणाले – X वर पोस्ट करुन YZ करणे बंद कर, नाहीतर आम्हाला बांबूचा वापर करता येतो – Pune News



भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळला आहे. मराठी माणसे आमच्या जीवावर जगतात, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी करताच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. वसंत मोरे यांनी

.

वसंत मोरे म्हणाले, बाहेरच्या राज्यातून एसीमध्ये बसून अशी वादग्रस्त वक्तव्य केली जातात आणि त्याचा त्रास इथल्या लोकांना भोगावा लागतो. एवढाच माज असेल तर तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा, तिकडे जाऊन उद्योगधंदे करा. आमच्या मराठी माणसाचे उद्योग तुम्ही का घेता? असा सवालही वसंत मोरे यांनी विचारला.

बांबू कुठे कधी वापरायचे माहिती

एक्स वर पोस्ट करुन वायझेड करणे बंद करा, जर कुणाला भिडायचे असेल, तर महाराष्ट्रात यावे, आम्ही तयार आहोत आणि ते जर येणार असतील मारामारीला, तर आमच्याकडे बांबू आहेत. हे बांबू आम्हाला कुठे आणि कधी वापरायचे माहिती आहे, असा दमही त्यांनी दिला. आम्ही किती टॅक्स देतो हे निशिकांत दुबेने शिवसेना मनसेला न विचारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले पाहिजे. ते म्हणतात की महाराष्ट्र नंबर वन आहे. मग तो नंबर वन हा बाहेरच्या लोकांमुळे आहे का? असा प्रश्नही वसंत मोरे यांनी केला आहे.

ठाकरेंचा पिक्चर पाहायचा असल्यास महाराष्ट्रात या

ठाकरे ब्रँड काय आहे हे त्यांना माहिती आहे. आतापर्यंत फक्त ट्रिझर दाखवला. जर पिक्चर पाहायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यावे, असे आव्हान वसंत मोरेंनी निशिकांत दुबे यांना दिले. निशिकांत दुबेने त्याच्या मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना आधी विचारावे आणि मग अशी वक्तव्य करावी, असेही ते म्हणालेत.

बोलायच्या आधी केडियाला कॉल करून विचारा

बाहेरुन आलेल्या व्यावसायिकांनी इथे येऊन राजकारण करु नये. एकतर त्यांनी व्यापार करावा किंवा राजकारण करावे. त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी आधी केडियाला फोन करून विचारावे. निशिकांत दुबे हा भाजपचा खासदार असून त्यांची पिळावळ वाढली आहे. यांना प्रांतवाद करायचा आहे आणि राजकारण करायचे असल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे.

हे ही वाचा…

भाजप खासदाराचे ठाकरे बंधूंना आव्हान:म्हणाले – हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा; उत्तरेत या तुम्हाला उचलून आपटतील

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्यावरून थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. हिंमत असेल तर हिंदी भाषिकाऐवजी उर्दू भाषिकांना मारून दाखवा, असे त्यांनी या दोन्ही भावांना डिवचत म्हटले आहे. राज व उद्धव ठाकरे यांनी बिहार व उत्तर प्रदेशात येऊन दाखवावे, त्यांना तिकडे उचलून आपटतील, असेही दुबे या प्रकरणी म्हणालेत. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *