मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या?: ‘व्हिट्स’च्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून विधिमंडळात गदारोळ; फडणवीसांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश – Mumbai News



संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्सच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचा विषय आज लक्षवेधी द्वारे विधान परिषद सभागृहात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडला. या खरेदी व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाले असून या कंत्राटात सहभाग घेतलेल्या तीन कंपन्यांच्या कंत्राट

.

राज्य सरकारची या व्यवहारात फसवणूक झाली आहे. या कंत्राट भरलेल्या कंपनीचे मालक सिद्धांत शिरसाट असून त्यांचे वडील राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांच्या वडिलांच्या निवडणूक शपथ पत्रात सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर कसलीच संपत्ती नसल्याचे नमूद करण्यात आले असल्याचेही दानवे यांनी निर्दशनास आणून दिले.

राज्य सरकारचे अधिकारी ही निविदा प्रक्रिया करण्यासाठी काम करतात. जी कंपनी नोंदणी नोंदणी कृतच नाही, कंपनीने मागील तीन वर्षांचा आरटीआर भरलेला नाही, सिद्धांत शिरसाट यांच्या वडिलांच्या शपथ पत्रात सिद्धांत शिरसाट यांची मालमत्ता शून्य असेल तर ते हॉटेल कसे काय घेऊ शकतात? असे प्रश्न आज विधान परिषद सभागृहात दानवे यांनी उपस्थित केले.

गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या वतीने गैरप्रकाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत कंत्राटांच्या अटी व शर्ती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत.

खरेदीसाठी केलेली लिलाव ‎प्रक्रिया रद्द

धनदा कॉर्पोरेशनच्या मालकीचे हॉटेल‎‘विट्स’ खरेदीसाठी केलेली लिलाव ‎प्रक्रिया अखेर रद्द झाली आहे. कारण ‎सर्वाधिक बोली लावणाऱ्या सिद्धांत ‎शिरसाट यांच्या कंपनीने मुदतीत 25 टक्के‎रक्कम भरलेली नाही. परिणामी, प्रशासनाने ‎लिलाव अमान्य करत न्यायालयाला‎ या संदर्भातील अहवाल देण्याचे आहे.‎ या लिलाव प्रक्रियेत सिद्धांत मटेरियल‎ प्रोक्युअरमेंट अँड सप्लाइज कंपनीने ६४‎ कोटी ८३ लाख रुपयांची सर्वाधिक बोली ‎लावली होती. त्यानंतर प्रशासनाने ‎नियमानुसार २५ टक्के रक्कम एका महिन्यात ‎भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, या प्रकरणात विरोधकांकडून अनेक आरोप झाल्यानंतर २० जून ही‎ अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही ‎कंपनीकडून एक रुपयाही भरला गेला नाही. त्यामुळे ‎नियमांनुसार लिलाव रद्द केला आहे. या ‎लिलावावर सुरुवातीपासूनच राजकीय ‎वादंग सुरू होते. कारण संबंधित कंपनी ही ‎पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या ‎पुत्राची असल्याचे उघड झाल्यानंतर ‎विरोधकांनी लिलाव प्रक्रियेतील ‎पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ‎होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24