पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आषाढी एकादशीच्या या काळात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पंढरपूरच्या कासेगाव येथे घडली आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून पत्नी मोनाली म्हमाजी आसबे हिने ऐश्वर्या व कार्तिक या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना समजताच पती म्हमाजी आसबे यांनी ही आज गळफास घेऊन आत्महत्या केली. एका दिवसात अख्ख्या कुटुंबाने आपले आयुष्य संपवले. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.
अधिकची माहिती अशी की, 4 जुलै रोजी पत्नी मोनाली म्हमाजी आसबे आणि पती म्हमाजी आसबे यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. वाद टोकाला गेला. यानंतर पत्नीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी मोनाली म्हमाजी आसबे आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह गावातील विहिरीजवळ गेल्या व विहिरीत उडी घेत तिघांनी आत्महत्या केली.
पत्नी आणि मुलांनी आत्महत्या केल्यामुळे पतीला याचा मानसिक धक्का बसला व त्याने दुसऱ्या दिवशी, 5 जुलै रोजी सकाळी गळफास घेत स्वतःला संपवले. या घटनेने एकाच घरातील चार जणांनी आत्महत्या केली व संपूर्ण कुटुंबच संपून गेले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज रांजणगाव परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय धनंजय आत्माराम पडघम या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. विशेष बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी धनंजय पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेतले होते आणि त्या दर्शनाचा व्हिडीओ त्याने शूट करून सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, त्याच रात्री त्याने घरात गळफास लावून जीवन संपवलं. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.