फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील मस्टर क्रमांक १२६७१, १२६७२ व महालकिन्होळा १२६८०, १२६८१ साठी अनेक कामांमध्ये फोटो एकच आहे.
तालुक्यात रोजगार हमीयोजनेअंतर्गत पाणंद रस्त्याची १६९कामे मंजूर होती. त्यामधील ११९कामे सुरू झाली, तर अद्यापही ५०कामे सुरू झालेली नाहीत. जीकामे सुरू आहेत, त्यामध्येऑनलाइन हजेरी घेताना ९६कामांत एकाच एकच फोटोअनेक गावांतील मस्टरवरवापरून ५ कोटी रु
.
मस्टरमध्ये मजूर म्हणूनमहिलांची नावे. मात्र अपलोडकेलेल फोटो पुरुषांचे, मजुरांच्याफोटोनुसार प्रत्यक्ष कामाची नोंदनाही, अनेक ठिकाणी योजनेचे वअंदाजपत्रकाची नोद असलेलेफलकच नाही,अनेक कामावरएकच फोटो वापरून हजेरी मस्टरभरल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शासनाच्या निधीतअपहार झाला असून, चौकशीसुरू करण्यात आली आहे.
योजनेसाठी हे प्रकरण गंभीर
पाणंद रस्त्याच्या कामावर अनेकमस्टवर एकच फोटो वापरणे हीअत्यंत गंभीर बाब आहे. स्थानिकमजुरांना लाभ मिळावा व गावाचाविकास व्हावा हा या योजनेचा हेतूआहे. परंतु प्रकरण गंभीर आहे.दोषींवर कारवाई केली जाईल, असेरोहयो उपमुख्य कार्यकारी अधिकारीअनुपमा नंदनवनकर यांनी सांगितले.
अशी असते प्रक्रिया
मोजमाप कंत्राटी तांत्रिक सहायकघेतात आणि याची एमबीमध्ये नोंदघेतात. त्यानंतर रोजगार सेवकग्रामसेवकाच्या ग्रामपंचायतलॉगिनमधून मस्टर हजेरी ऑनलाइनभरून घेतात. पंचायत समितीचेलेखाधिकारी आणि गटविकासअधिकारी यांच्या सहीने मजुरांचेपेमेंट होते, अशी प्रक्रिया आहे.
चौकशीनंतर कारवाई
हा प्रकार खूप गंभीर आहे. कंत्राटीकामगार असल्याने मी प्रत्येक गोष्टी बघू शकत नाही. याची गांभीर्यानेदखल घेण्यात येईल. याप्रकरणी चौकशी करून यात तथ्य आढळल्यासदोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
-उषा मोरे, गटविकास अधिकारी