कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा ‘विक्रम’: 24 तासांत 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद, जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प भरले – Kolhapur News



कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासांत शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. या त्रिशतकी धमाक्याने कोयना धरणात तब्बल पावणे तीन टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणातील पाणीसाठा सत्तरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्या

.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाच्या सरी बरसत असून दुर्गम भागातील जनजीवन गारठले आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरमध्ये 104 मिलीमीटर, नवजा येथे 115 आणि महाबळेश्वरमध्ये 95 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांत झाली आहे. धरणात प्रति सेकंद 30 हजार 891 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा सत्तरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सध्या धरणात ६७.२० टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

नागरिकांना पुराच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन

सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे घाटमार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांनी काळजी घेण्याचे आणि दुर्गम भागातील नागरिकांनी पुराच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, घाटमाथ्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने प्रशासन सतर्क आहे. पावसामुळे कोयना धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होणार असल्याने धरणातून विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे.

लघु आणि मध्यम प्रकल्प भरले

गेली काही दिवस संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कण्हेर, उरमोडी, तारळी, महिंद धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वेण्णा, उरमोडी, तारळी, वांग नढ्या दुथडी भरून वाहत आहेत. आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने ओढे, नाले, ओहोळ आणि पुलांवरून पाणी वाहू लागल्यास प्रवाहात जाऊन जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24