Pune UPSC candidate: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजचे यूपीएसस्या परीक्षेसाठी देशभरातून लाखो उमेदवार तयारी करत असतात. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यसाठी उमेदवार दिवसरात्र अभ्यास करतात. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी ते आपली झोपेचा त्याग करतात. कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. पण जर यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका इच्छुक उमेदवाराला झोपेसाठी 9 लाख रुपये देण्यात आले, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? कदाचित तुम्हाला यावर विश्वास ठेवणे कठीण होईल, पण हे खरे आहे.
झोपण्यासाठी मिळाले 9 लाख रुपये
पुण्यातील पूजा माधव वाव्हळ ही एक यूपीएससीची इच्छुक उमेदवार आहे. जी यूपीएससी उत्तीर्ण करून आयपीएस बनू इच्छिते. असे असले तरी तिच्या यूपीएससी तयारी दरम्यान तिने एकही संधी सोडली नाही. यामुळेच आज तिने 9 लाख रुपये जिंकले आहेत.
‘स्लीप चॅम्पियन ऑफ द इयर’
पूजाने एक अनोखे पदक जिंकले आहे. हे ‘स्लीप चॅम्पियन ऑफ द इयर’ चे टायटल आहे. बंगळुरूमध्ये एक इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये तुम्हाला 60 दिवसांसाठी दररोज 9 तास झोपावे लागत होते. म्हणून पूजा या इंटर्नशिपचा भाग बनली आणि ती जिंकली. तिला बक्षीस म्हणून 9 लाख रुपये मिळाले. कारण ती दररोज पूर्ण 9 तास झोपत होती.
ही झोपेवर आधारित इंटर्नशिप काय आहे?
भारतात झोपेच्या कमतरतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. हा कार्यक्रम वेकफिट नावाच्या कंपनीने आयोजित केला होता. ज्यामध्ये देशभरातून 1 लाखाहून अधिक लोकांनी अर्ज केले होते. त्यापैकी फक्त 15 उमेदवारांची निवड झाली. या स्पर्धेत अनेक मजेदार कामे करावी लागतात. ज्यामध्ये पूजाने प्रथम क्रमांक मिळवून 9 लाख रुपये जिंकले.
उपक्रमाला सोशल मीडियावर मोठी पसंती
यामध्ये सहभागींना त्यांच्या झोपेच्या सवयींचे निरीक्षण करून त्याबाबत डेटा गोळा करणे आवश्यक होते. पूजा वाव्हाळने या इंटर्नशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ‘स्लीप चॅम्पियन’ हा किताब मिळवला. या योजनेत तिला दोन महिन्यांत 1 लाख रुपये आणि त्यानंतर 9 लाखांचे बक्षीस मिळाले.वेकफिटच्या या उपक्रमाला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळाली आहे.
झोपेच्या महत्त्वाबाबत जागरूकता
यूपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्येही या योजनेची विशेष चर्चा आहे. पूजाच्या यशामुळे बंगळुरूमधील तरुणांमध्ये नवीन संधी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत उत्साह वाढला आहे. तिने या यशाचे श्रेय आपल्या मेहनतीसह वेकफिटच्या अनोख्या संकल्पनेला दिलंय. ही योजना भविष्यातही आयोजित होण्याची शक्यता आहे. यामुळे झोपेच्या महत्त्वाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल, असे कंपनीने म्हटले आहे.