पुण्यातून धक्कादायक बातमी! विद्यार्थ्यांच्या हातात कोयते अन् हातोडा… आझम कॅम्पसमध्ये राडा


पुणे हे शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जातं. पण या सुशिक्षित परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कॉलेजमध्येच राडा झाला असून विद्यार्थीच जखमी झाले आहेत. 

शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात राडा झाला आहे. आझम कॅपम्समध्ये विद्यार्थ्यांनी जिथे पेन, वही, अभ्यासाचं साहित्य घेऊन येणं अपेक्षित आहे. तेथे अक्षरशः कोयता आणि हातोडे घेऊन येताना दिसले. विद्यार्थी एवढ्यावरट थांबले नाही तर त्यांना जबर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पुण्यातील आझम कॅम्पस मधील घटना असून याघटनेत २ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.  हातात कोयते घेऊन कॉलेज परिसरात मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे शिक्षण संस्थेवरचा विश्वास डगमळीत होत आहे. विद्यार्थ्यांचा हा राडा नेमका कशावरुन झाला? याबाबत कोणतीही माहिती नाही. 

आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात परिसरात कोटावळे हा परिसर आहे. येथे आझम ही शिक्षण संस्था आहे. या संस्थेत मुस्लिम विद्यार्थीच शिक्षण घेतात. तेथे हा राडा झाला आहे. हातोडे आणि कोयत्याने विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे. विद्यार्थ्यांच्या दोन गटात ही मारहाण झाली आहे. याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. पण प्रश्न असा पडतो की, विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थेत कोयते आणि हातोडे आले कुठून?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24