मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो: तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, भोजपुरी अभिनेत्याचे ठाकरेंना आव्हान – Mumbai News



मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे आव्हान भाजप नेता व भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. उद्योजक सुशील केडियाने देखील काही दिवसांपूर्वी मी मराठी

.

दिनेश लाल यादव म्हणाले, अशा प्रकारची गोष्ट देशात कुठेही घडू नये. आपला देश विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो आणि या विविधतेतूनही एकतेचे उदाहरण घालून देतो. गलिच्छ राजकारण करणाऱ्या लोकांनी असे वागू नये आणि त्यांनी स्वतःला सावरावे. मी मराठी बोलत नाही. मी उघड आव्हान देतो, तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे म्हणत त्यांनी थेट ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.

पुढे बोलताना दिनेश लाल यादव म्हणाले, हे तोडण्याचे राजकारण करू नका. जोडण्याचे राजकारण करा. तुम्ही घाण राजकारण करू नका. मी स्वतः एक राजकारणी देखील आहे. राजकारण लोकांच्या भल्यासाठी असले पाहिजे, असे मी मानतो. देशाच्या भल्यासाठी असली पाहिजे. कोणाची क्षमता असेल की, तो अनेक भाषा शिकू शकतो. तर त्याने शिकली पाहिजे. मराठी फार चांगली भाषा आहे. प्रेमळ भाषा आहे. भोजपुरी देखील प्रेमळ भाषा आहे. गुजराती आहे, मराठी आहे, तेलगू आहे, तमिळ आहे.. प्रत्येक भाषेचे एक वेगळे सौंदर्य आहे. क्षमता असेल तर सगळ्या भाषा शिकायला हव्यात.

सुशील केडियाची माघार

मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता सुशील केडियाने माघार घेतली आहे. त्यानी एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले, मी केलेले ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिले गेले होते. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24