गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याच
.
महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. पण या प्रकरणी वाद झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. पण आता या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला केलेली मारहाण व त्यानंतर व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे स्थिती अधिकच चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर केडियोनोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना उपरोक्त आव्हान दिले आहे.
काय म्हणाले सुशील केडिया?
मागील 30 वर्षे मी मुंबईत राहिलो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत सुशील केडिया?
सुशील केडिया हे एक प्रसिद्ध व्यावसायिक व केडियानोमिक्सचे संस्थापक आहेत. ते शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. त्यांची गुंतवणूक सल्लागार म्हणूनही ओळख आहे. त्यांची कंपनी गुंतवणूक व बाजारपेठेतील विश्लेषणाचे काम करते.
मनसेविरोधात मीरा – भाईंदरमध्ये मोर्चा
मनसैनिकांनी जोधपूर मिठाई दुकानदाराला केलेल्या मारहाणीविरोधात मीरा भाईंदर येथील व्यापाऱ्यांनी गुरूवारी मोर्चा काढला. या मोर्चात हजारो व्यापारी सहभागी झाले होते. मनसेने या प्रकरणी अधिक आक्रमक भूमिका घेत हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नव्हे तर भाजपचा असल्याचा आरोप केला. यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनीच व्यापाऱ्यांना भडकावून हा मोर्चा काढण्यास सांगितले. बुधवारी रात्री संबंधित व्यक्तीला मी स्वतः भेटून त्यांच्याशी बोललो. त्यावेळी त्यांनी मोर्चा वगैरे काढणार नाही, असे सांगितले व झालेल्या घटना चूक असल्याचेही सांगितले. पण गुरूवारी अचानक हजारो व्यापारी रस्त्यावर उतरल्याने हा मोर्चा भाजपाचा असल्याचे स्पष्ट झाले, असे अविनाश जाधव म्हणाले.