श्रीमंत बाजीराव पेशवे सर्व युद्ध देश-स्वराज्यासाठी लढले: अमित शहा यांचे गौरवोद्गार; शक्ती – पराक्रम असताना पेशवेच राहिल्याचा उल्लेख – Pune News



श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी 41 युद्ध केले आणि एकाही युद्धात पराभव होऊ दिला नाही. ते स्वत:साठी नाही तर देश आणि स्वराज्यासाठी लढत होते. ते स्वराज्याचे केवळ पंतप्रधान होते. त्यांच्यात इतका पराक्रम आणि एवढी मोठी शक्ती असताना देखील ते पेशवेच राहिले, असल्य

.

पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळा अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालच पुण्यात दाखल झाले होते. या वेळी ते बोलत होते.

श्रीमंत बाजीराव पेशवे यांना कोणी, ईश्वरदत्त सेनापती, अजिंक्य योद्धा, श्रीमंत बाजीराव पेशवे असे म्हणतात. त्या वेळी अनेक राजांनी विजय मिळवला होता. मात्र बाजीराव पेशवे ते स्वतःसाठी लढले नाहीत. तर देश आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी लढले. त्यांचे प्रत्येक युद्ध हे मातृभूमीसाठी, धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी होते. आपल्या चाळीस वर्षाच्या जीवनात त्यांनी अमर इतिहास लिहिण्याचे काम केले. पुढील अनेक शकते ते कोणीही करू शकणार नसल्याचेही शहा यांनी म्हटले आहे.

एनडीए पुणे स्मारकासाठी योग्य जागा

पेशवा बाजीराव यांचे स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीए पुणे अकादमीच असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. देशातील तिन्ही सेनांचे आगामी काळातील सूत्रधार ज्या ठिकाणी प्रशिक्षित होऊन निघतात. त्या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारणे आणि त्यांच्या या मूर्ती पासून प्रेरणा घेऊन, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्या भविष्यातील सैनिक जाणार असतील तर अनेक वर्षापर्यंत भारतीय सीमा भागाला हात लावण्याचा कोणीही हिंमत होणार नाही. असा मला विश्वास असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

हत्यार बदलत राहतात, विजयासाठी देशभक्तीचा भाव महत्त्वाचा

आजची युद्धाची परिस्थिती आणि बाजीराव पेशवे यांच्या काळातील युद्धाची पद्धती, यांच्यात काय साम्य असल्याचा प्रश्न विचारला जातो. मात्र, युद्ध कलेच्या पद्धतीत काही कला या कायम असतात. यामध्ये युद्धामधील व्ह्यूव रचना, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, समर्पण, देशभक्तीचा भाव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बलिदानाचा भाव. हेच सैनिकांना विजय मिळवून देते. हत्यार बदलत राहतात मात्र, या सर्व गोष्टी कायम राहत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. या सर्वांचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण पाचशे वर्षांच्या इतिहासात पाहायचे असेल तर इतिहासाचा विद्यार्थी म्हणून केवळ पेशवे श्रीमंत बाजीराव यांच्यात मिळत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24