मुक्ताईनगर तापीतीर ते भीमा तीर जाणारा मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून ६ जून रोजी प्रस्थान केलेल्या आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळा आज श्रीक्षेत्र पंढरपूरात मोठ्या उत्साही वातावरणात दाखल झाला. ३ जुलै रोजी रोपडे येथे दुपारचा विसावा घेऊन पालखी सोह
.
पंढरपुरात प्रवेश करणारी पहिली पालखी : चंद्रभागा स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा जुने दगडी पुलावर आला असता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत मुक्ताई पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यानंतर पंढरपूर येथे पालखी सोहळा दत्त घाटावरील मुक्ताई मठात दाखल झाला. तेथे मुक्ताईंच्या पालखीची आरती करण्यात आली व मुक्ताईंचा पालखी सोहळा दत्त घाटावरील मुक्ताई मठात श्रीक्षेत्र पंढरपूरात विसावला.
अॅड.रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, संदीप पाटील, सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे,सर्व वारकरी व भाविक उपस्थित होते. ५ जुलै रोजी वाखरी येथे होणाऱ्या ऐतिहासिक पालखी भेटीच्या सोहळ्याची सर्वांना उत्सुकता असून सर्व पालखी सोहळे एकत्र येणार असून वाखरी येथे हा संत भेटीचा सोहळा होईल.