भादलीहून जळगावकडे येणाऱ्या ३९ वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव कारने धडकदिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी भादलीजवळील पेट्रोल पंपाजवळघडली. माेहंमद इब्राहिम खाटीक (रा. भादली)असे मृताचे नाव आहे. दरम्यान, हा अपघातनस
.
गांधी मार्केट परिसरातील हाॅकर्स माेहंमद खाटीक गुरुवारी सकाळी ११ वाजतादुचाकीने जळगावकडे निघाले. त्याचवेळीमागून डंपर आल्याने त्यांनी दुचाकीरस्त्याच्या बाजूला घेतली आणि पुन्हामुख्य रस्त्यावर आणून जळगावकडेनिघाले. तेव्हा मागून भरधाव आलेल्याकारने (क्रमांक एमएच १९/५३९६)खाटीक यांना उडवले. त्यानंतर २/३ वेळाकारचालक दीपक धनगर याने कार मागेपुढे करून धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शीजावेद, जाकीर, शाहरुख हसन पटेल,दानिश खाटीक यांनी जीएमसीत सांगितले.यात खाटीक जखमी झाले. दरम्यान,याप्रकरणी दीपक धनगर याच्याविरुद्धसदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यातआला असून, त्याला ताब्यात घेण्यातआल्याचे उपविभागीय पाेलिस अधिकारीसंदीप गावित यांनी सांगितले.
जीएमसीत खुनाचा आराेप
प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिल्यानंतर हाअपघात नसून, खून असल्याचा आराेपमृताच्या नातेवाइकांनी करत आक्रमकपवित्रा घेतला. माहिती मिळाल्यानंतरखाटीक समाजाचे जिल्हाध्यक्ष माैलानाहारून नदवी, व्यावसायिक बिट्टू सालारआदी जीएमसीत दाखल झाले हाेते.
अपघातानंतर नागरिकांनी दीपक धनगरलाजबरदस्तीने थांबवले व जखमी खाटीकयांना त्याच कारमधून जीएमसीत दाखलकेले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यूझाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे. जखमीलाजीएमसीत साेडल्यानंतर दीपकने धमकीदिल्याचे उपस्थितांनी सांगितले. मृताच्याकुटुंबीयांच्या माहितीनुसार माेहंमद खाटीक,दीपक धनगर व बबलू हे मित्र आहे. दीपक,माेहंमद यांच्यात वाद झाला हाेता. त्यांच्यातदाेन वर्षांपासून अबोला होता.