मुंबईतल्या एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थ्यावर शिक्षिकेनं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्याच्या बहाण्यानं आधी जवळीक साधली आणि नंतर त्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं.या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली. शिक्षिकेने गुन्हा कबूल केला असून शिक्षिकेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्यात मदत करणाऱ्या शिक्षिकेच्या एका मैत्रिणीवरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.