घ्यारे भोकरे भाकरी | दहि भाताची शिदोरी ॥ तोंडले-बोंडले गावच्या शिवारातील नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षापासून येथे दिंड्यांना थालीपीठ, दह
.
गुरुवारी दुपारी पालखी सोहळा जेवणासाठी तोंडले येथील आेढ्याच्या काठावर विसावला होता. गावातील सर्व रस्त्यांसह, चौकांमध्येही सर्वत्र जेवणाच्या पंगती बसविण्यात आल्या होत्या. येणाऱ्या प्रत्येकांना या माउली, बसा जेवायला… अशी विनंती करीत आग्रहाने जेवायला वाढण्यात येत होते.तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदि भागातील गावकरी अक्षरश: ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून शिदोरी घेऊन आले होते. हजारोंच्या संख्येने रस्त्यांवर, गावातील प्रमुख चौकामध्ये जेवायला बसले होते. पहावे तिकडे जेवणाच्या पंगती, आग्रहपूर्वक जेवायला वाढणाऱ्यांची लगबग होती. वासकरांच्या दिंडीत वारकऱ्यांनी दही, थालेपीठ, उसळी, लोणच्यांचा शिदोरीचा आनंद घेतला.

कर्नाटकच्या भाविकाचे दही दान
कर्नाटकच्या ज्योतिबा चव्हाण नामक वारकरी मागील दहा वर्षांपासून वारीत दही वाटप करत आहे. मागील १० वर्षापासून अथनी (कर्नाटक) येथून १५० लिटर दही घेऊन सोहळ्यात वाटप करतो. गावकऱ्यांना ही सेवेची संधी मिळत आहे, असे ते म्हणाले. कर्नाटकचे अन्य एक वारकरी श्रीकांत आवटी यांनीही यावेळी आपली भावना व्यक्त केली. माऊलीच्या पालखी सोहळयातील वासकर महाराज दिंडी मध्ये भाविकांना दही धपाटे, मिरचीचा ठेचा असे जेवण देण्यासाठी 35 ते 40 सेवक कर्नाटक येथून येतो. हरी भजन म्हणत महिला स्वयंपाक करतात, असे ते म्हणाले.