Viral Video: हॉटेलमधील चमचमीत जेवण सर्वांनाच आवडतं. मात्र, याच हॉटेलच्या जेवणाचे किळसवाणं रुप सध्या उघड झालं आहे. एका हॉटेलात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं अन्न शिजवताना त्यात चक्क जमीनीवरील कचरा टाकला आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हॉटेलच्या किचनमध्ये काम करताना हा कर्मचारी सुपलीमध्ये कचरा गोळा करत असून शिजवलेल्या अन्नात सुपलीतला कचरा टाकत आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आता हॉटोलमध्ये जाऊन जेवणार असाल तर 100 वेळा विचार करा.
नेमकं व्हिडीओमध्ये काय?
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये प्रसिद्ध हॉटेलमधील जेवण बनवतानाचे किंवा हॉटेलमधील वेगवेगळ्या पदार्थांचे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक हॉटेलचा कर्मचारी मोठ्या भांड्यात भाजी बनवताना दिसत आहे. ही भाजी उकळत असून तो तेथील साफ सफाई करत आहे. साफ सफाई झाल्यानंतर तो हॉटेलचा कर्मचारी तेथील कचरा गोळा करून सुपलीमध्ये भरतो.
सर्व कचरा घेऊन तो तिथे शिजत असणाऱ्या भाजीच्या भांड्याजवळ येतो. त्यावेळी तिथे कोणीही नसल्याने तो त्याच्या हातामधील सुपलीतील कचरा शिजत असलेल्या भाजीत टाकतो. हा संपूर्ण प्रकार तिथे असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सध्या या कर्मचाऱ्याने केलेले हे कृत्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी हॉटेल्समधील किचनच्या आणि पदार्थांवर प्रश्न उपस्थित केला आहे.
नागरिकांकडून हॉटेलवर कारवाईची मागणी
हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजले नाही. परंतु हा व्हिडीओ मोठ्या हॉटेलमधील असल्याचं दिसत आहे. सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी या हॉटेल्सवर आणि मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर हा व्यक्ती एकटाच कसा तिथे होता तिथे दुसरे कोणी नव्हते का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर या पुढे हॉटेलमध्ये जेवण करणे योग्य आहे का? असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.