आजचा भारतीय जनता पक्ष म्हणजे डरपोक लोकांची ‘डी गँग’ असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक मधील उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजप उद्या दाऊद इब्राह
.
नाशिक मधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या सर्वांवर गुन्हा दाखल झालेला असून अटक होण्याच्या भीतीने ते पोलिसांच्या रेकॉर्डनुसार फरार आहेत. असे फरार आणि डरपोक लोकच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तुमच्यावर भ्रष्टाचार, दंगे, बलात्कार असे कोणते गुन्हे दाखल असेल तरच तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जातो, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
नारायण राणे यांनी वयाचे तरी भान राखावे
ज्या व्यक्तीने तीन-तीन वेळा पक्ष बदलले आहेत. जी व्यक्ती स्वतःचा पक्ष चालवू शकली नाही. जी व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली त्याने काँग्रेसला शिव्या दिल्या. भाजपमध्ये गेली तिथेही त्यांचे सुरुवातीपासून काही जुळले नाही. शिवसेनेमध्येही त्यांनी शेवटी- शेवटी गोंधळच घातला. अशा व्यक्तीला महाराष्ट्र फार गांभीर्याने घेत नाही. अशा शब्दात राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला. भाजपमध्ये गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्र यावर प्रवचन झाडण्याचा अधिकार नाही. नारायण राणे यांनी भाजपमध्ये जाऊन कोकणातील मराठी माणसाचे नुकसानच केले आहे. नारायण राणे यांच्या सारखे सर्व गुलाम नसतात. चामडी वाचवण्यासाठी काही पक्ष बदलत नाहीत. काही स्वाभिमानी लोक आहेत त्यांच्यामुळे आजही महाराष्ट्र टिकलेला आहे. तुम्ही आहात म्हणून किंवा भाजप आहे म्हणून महाराष्ट्र टिकलेला नाही. त्यामुळे आता नारायण राणे यांनी वयाचे तरी भान राखावे, असा सल्ला देखील राऊत यांनी दिला.
नरेंद्र जाधव यांचा संघ परिवाराशी संबंध
नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत. मात्र त्यांचे संघ परिवाराशी संबंध आहेत. असे म्हणत संजय राऊत यांनी त्रिभाषा सूत्र संदर्भात अभ्यास करणाऱ्या समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, समितीचे अध्यक्षपदी कोणीही असले आणि कोणी कसाही अहवाल दिला तरी, मराठी वर होणारा अन्याय आणि हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्र कोणत्याही समितीचा अहवाल स्वीकारणार नाही, असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याचे मुख्य आकर्षण उद्धव-राज ठाकरे
मराठी भाषेसंदर्भात पाच जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कमीत कमी गर्दी असावी, व्यास पीठावरील मुख्य आकर्षण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच असावे, लोकांनी तुफान गर्दी करावी आणि विजयी जल्लोष साजरा करावा. या व्यतिरिक्त या कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल नाही. असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.