फोटोग्राफर – क्रांतिवीर भुईंबर
या उक्तीप्रमाणे सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संतांच्या पालखी सोहळा पंढरपूर तालुक्याच्या वेशीजवळ आला आहे. टाळ-मृदंगाचा निनाद, ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषाने दुमदुमले आसमंत, वारकऱ्यांच्या गर्दीचा अथांग सागर, नभांगणात झालेली ढगांची दाटी अन्
.

सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान दरम्यान पालखी सोहळा दाखल झाला. सेवेकऱ्यांच्या खांद्यावरून पालखी रिंगण तळावर आणली गेली. राजाभाऊ चोपदारांनी रिंगण लावून घेतले. शितोळे सरकार यांनी रिंगणाची पाहणी केली. सुरवातीला भोपळे दिंडीने जरीपताका घेऊन रिंगणास प्रदक्षिणा घातली.

त्यानंतर रिंगणासाठी सज्ज असलेल्या अश्वांना माउलींच्या पालखीतील पादुकांवरील हार घालून बुक्का लावण्यात आल्या. ‘ज्ञानोबा- माउली, माउली’ असा जयघोषात रिंगणास सुरवात झाली अन् स्वाराचा अश्व रिंगात धाव घेताच, माउलींच्या अश्व चौखुर उधळून त्यामागे सुसाट वेगात धावत निघाला. स्वाराचा अन् माउलींच्या अश्वाचा जणू पाठशिवणीचा खेळ सुरु असल्यासारखचे चित्र होते.

रिंगण सोहळ्यानंतर मानाच्या दिंड्या पाऊल अन् उड्या खेळण्यासाठी रिंगणामध्ये दाखल झाल्या. ज्ञानोबा-तुकारामच्या निनादात पाऊलांचा खेळ रंगला. टाळ- मृंदगाची जुगलबंदी अन् एकाच लयीत पडणारा पावलांचा ठेका पाहण्यासाठी वारकर्यांनी गर्दी केली.

वीणेकरी, तुळशीवृंदावन घेतलेल्यांचे झाले रिंगण

वारी सोहळ्यामध्ये वीणेकरी तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, वीणेकरी, पखवाज वादकांनी टाळकऱ्यांच्या सभोवताली रिंगण घातले. टाळ-मृदंगाचा गरज अन् ‘माऊल-माउली’ नामाच्या जयघोषाने परिसर निनादला होता.
